Salman Khan Black Buck Case: सलमान खान पुन्हा न्यायालयात गैरहजर; पुढील सुनावणी 19 डिसेंबर रोजी

काळवीट शिकार (Black Buck Case) व अवैधरित्या शस्त्रे बाळगल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. मात्र आजही सलमान कोर्टात हजर झाला नाही, त्यामुळे या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 डिसेंबर रोजी जोधपूर कोर्टात होणार आहे

सलमान खान (Photo Credits: Instgaram)

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या विरुद्ध आज जोधपूर न्यायालयात सुनावणी पार पडणार होती. काळवीट शिकार (Black Buck Case) व अवैधरित्या शस्त्रे बाळगल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. मात्र आजही सलमान कोर्टात हजर झाला नाही, त्यामुळे या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 डिसेंबर रोजी जोधपूर कोर्टात होणार आहे. या सुनावणी आधी सोशल मिडीयावर सोपु टोळीने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या कारणामुळे सलमान आज कोर्टात हजर राहणार नाही, असे त्याचे वकील हस्तीमल सारस्वत यांनी आधीच सांगितले होते. त्यानुसार सलमान आजच्या कारवाईसाठी गैरहजर राहिला.

एएनआय ट्विट -

सलमान खान कोर्टात हजर न झाल्यामुळे बिश्नोई समाज पुन्हा एकदा भडकला आहे. याबाबत बोलताना बिश्नोई समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे वकील महिपाल बिश्नोई म्हणाले, ‘सलमान नेहमीच असे नाटक करतो. सुनावणीच्या एक-दोन दिवसांपूर्वी मुद्दाम सोशल मिदियावरून  त्याला धमकी दिली जाते. त्यानुसार सुरक्षेचे कारण देऊन तो न्यायालयात गैरहजर राहतो.’ विशेष म्हणजे, मागच्या सुनावणीत कोर्टाने म्हटले आहे की, सलमान खानला हजर केले नाही तर त्याचा जामीन फेटाळला जाईल. सीजेएम कोर्टाने गेल्या वर्षी सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर, त्याला 2 दिवस जामीन मिळू शकला नाही, यामुळे तो तुरुंगातही राहिला आहे. (हेही वाचा: काळवीट शिकार प्रकरण: सैफ अली खान, सोनाली बेंद्रे आणि तब्बू यांच्यासह अन्य कलाकारांना जोधपुर हायकोर्टाने 'या' कारणामुळे धाडली नोटीस)

आता नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकली आहे. याबाबत आता न्यायालयाने जमीन रद्द करण्याचा इशाराही दिला आहे. दरम्यान, 1998 साली 'हम साथ साथ है' सिनेमाच्या शुटिंग दरम्यान जोधपूर येथे काळवीटची शिकार आणि शस्त्र बाळगल्याने सलमान खानवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात सोनाली बेंद्रे, सैफ अली खान, तब्बू आणि नीलम या कलाकारांची नावे सुद्धा समोर आली होती, मात्र कोर्टाने त्यांना निर्दोष घोषित केले. तर सलमानला शस्त्र परवाना कोर्टात करण्याचे आदेश देण्यात आले.