दिलीप कुमार - सायरा बानूंच्या 52 व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर करण्यात आला खास फोटो

न्युमोनियाच्या त्रासामुळे लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दिलीप कुमारांना कालच डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सायरा बानू आणि दिलिप कुमार Photo Credits Twitter

सायरा बानू आणि दिलीप कुमार ही हिंदी सिनेजगतातील एक एव्हरग्रीन जोडी आहे. सायरा बानू दिलीप कुमार यांच्या पाठीमागे सावलीप्रमाणे असतात. आज दिलीप कुमार आणि सायरा बानू यांच्या लग्नाचा 52 वा वाढदिवस आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सायरा बानू यांनी ट्विटरवर एक खास फोटो शेअर केला आहे. सोबतच दिलीप कुमार यांच्यासाठी खास संदेश लिहून त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

दिलीप कुमार यांना 'कोहिनूर' असं संबोधत त्यांच्या लग्नाच्या 52 व्या वाढदिवसाबद्दल हिंतचिंतकांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करून धन्यवाद दिले आहेत. दिलिप कुमार हे माझे सर्वस्व असल्याचे सांगत सायरा बानूंनी दोघांचा एक दुर्मिळ आणि आवडीचा फोटो शेअर केला आहे.

दिलीप कुमार यांची प्रकृती मागील काही दिवस अत्यावस्थ होती. न्युमोनियाच्या त्रासामुळे दिलीप कुमार लीलावती रूग्णालयात होते. सध्या ते कोणालच ओळखत नाही असे काही मीडिया रिपोर्ट्समधून पुढे आले आहे. मात्र लग्नाच्या वाढदिवसापूर्वी अवघे काही तास आधीच रूग्णालयातून त्यांना सुट्टी देण्यात आल्याने या क्षणाचा आनंद द्विगुणित झाला आहे.



संबंधित बातम्या