सैफ अली खान, करीना कपूर चा तैमूरसोबत मरीन ड्राइव्हवर फेरफटका: पोलिसांनी केली 'ही' सुचना; पहा व्हिडिओ

परंतु, त्यांना फार वेळ आनंद घेता आला नाही. मरीन ड्राइव्हवर करीना आणि सैफ चिमुरड्या तैमुरला घेऊन फिरत असताना त्यांना पोलिसांनी अडवलं.

Saif Ali Khan, Kareena Kapoor's, Timur (PC - Instagram)

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आपली पत्नी करीना कपूर (Kareena Kapoor's) मुलगा तैमूर  (Timur) सोबत रविवारी मरीन ड्राइव्हवर (Marine Drive) फेरफटका मारताना दिसले. परंतु, त्यांना फार वेळ आनंद घेता आला नाही. मरीन ड्राइव्हवर करीना आणि सैफ चिमुरड्या तैमुरला घेऊन फिरत असताना त्यांना पोलिसांनी अडवलं.

लहान मुलांना बाहेर फिरण्यास परवानगी नसल्याचं म्हणत पोलिसांनी सैफ आणि करीनाला तैमुरला घरी घेऊन जाण्यास सांगितले. त्यामुळे करीना आणि सैफ लागलीचं तेथून घरी गेले. सध्या सोशल मीडियावर सैफ-करीना आणि तैमुर चे मरीन ड्राइव्हवर फिरतानाचे फोटो तसेच व्हिडीओ व्हायरल होत आहेत. (हेही वाचा  - सोनू सूद आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी दिली पहिली प्रतिक्रिया, पहा काय म्हणाले शिवसेना नेते)

 

View this post on Instagram

 

70 दिन से ज़्यादा के लॉकडाउन के बाद मुंबई के मरीन ड्राइव पर अब लोगों की भारी भीड़ देखने को मिल रही है. कल यहां सैफ अली खान और करीना कपूर भी बेटे तैमूर के साथ पहुंचे. इस दौरान सैफ़ बेटे तैमूर को अपने कंधे पर बिठाए हुए दिखाई दिए. इन तीनों की ये वीडियो सोशल मीडिया पर वायरल है जिसमें एक शख़्स सैफ़को हिदायत देते हुए कहता है कि छोटे बच्चों को बाहर नहीं लाना है. कहा जा रहा है कि वीडियो में सैफ अली खान से बात करने वाले शख़्स मुंबई पुलिस के अधिकारी है, जो मरीन ड्राइव पर सर्पाकार द्वारों दिए गए उल्लंघन ना हो ये सुनिश्चित करने वहां मौजूद थे. • • • • rozsamachar.in • • • #SaifAliKhan #KareenaKapoorKhan #kareenaKapoor #Taimur #TaimurAliKha #MarineDrive #ViralVideo #Video #ViralPost #Videooftheday #India #news #rozsamachar #indiaviral

A post shared by रोज़ समाचार (@rozsamachar) on

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सैफने तैमुरला आपल्या खांद्यावर उचलून घेतलेले पाहायला मिळत आहे. तर करीना समुद्र किनारी मोकळ्या हवेचा आनंद घेताना दिसत आहे. यावेळी तेते अचानक पोलिस आले आणि त्यांनी सैफ-करीनाला लहान मुलांना बाहेर घेऊन येण्यास परवानगी नसल्याचे सांगितले. त्यामुळे सैफ आणि करीना लगेचचं घरी गेले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आतापर्यंत 5 वेळा लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून नागरिक घरातचं होते. आजपासून पाचव्या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक नागरिक घराबाहेर पडले आहेत.