Saif Ali Khan Aattack: 'अवघ्या 5 दिवसांत इतका फिट? कमाल आहे!'; सैफ अली खानच्या डिस्चार्जनंतर शिवसेना नेते Sanjay Nirupam यांनी उपस्थित केले प्रश्न

हल्ल्यानंतर आता सैफ अली खानच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अभिनेत्याच्या घराच्या फ्लोअर डक्टला जाळ्याने पॅक करण्यात आले आहे. सैफ अली खान आणि करीना कपूर खान त्यांची मुले- जेह आणि तैमूरसोबत राहतात. त्यांच्या इमारतीच्या 12 व्या मजल्यावरील सर्व एसी डक्ट क्षेत्र जाळीच्या स्क्रीनने सील करण्यात आले आहेत.

संजय निरुपम (Photo Credits-Twitter)

चित्रपट अभिनेता सैफ अली खानला (Saif Ali Khan) मंगळवारी (21 जानेवारी) पाच दिवसांनी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. अहवालानुसार 15-16 जानेवारीच्या रात्री त्याच्यावर हल्ला झाला होता, ज्यात त्याला गंभीर जखम झाली होती. आता  डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. काल तो पहिल्यांदाच मीडिया आणि चाहत्यांसमोर दिसला. यावेळी अभिनेत्याने हात उंचावून सर्वांना अभिवादन केले. मात्र, सैफ अली खान ज्या पद्धतीने हॉस्पिटलमधून बाहेर आला त्यावरून अनेकांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. यामध्ये शिवसेना नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनीही सैफ अली खानचा व्हिडिओ ट्विट करून त्याच्या तब्येतीवर प्रश्न उपस्थित केला आहे. संजय निरुपम यांनी म्हटले आहे की, फक्त 5 दिवसात इतका फिट कसा असू शकतो?.

संजय निरुपम म्हणतात, ‘डॉक्टरांनी सांगितले की, सैफ अली खानच्या पाठीत 2.5 इंच खोलवर चाकू घुसला होता. बहुधा तो आत अडकला असावा. ही शस्त्रक्रिया सलग 6 तास सुरू होती. हा सर्व प्रकार 16 जानेवारी रोजी घडला, आता आज 21 जानेवारी. सैफ अली खान हॉस्पिटलमधून बाहेर पडताच इतका फिट झाला? अवघ्या ५ दिवसात? कमाल आहे!.’

अली खानच्या डिस्चार्जनंतर शिवसेना नेते संजय निरुपम यांनी उपस्थित केले प्रश्न-

संजय निरुपम म्हणाले, 'पहिली गोष्ट म्हणजे मला सैफ अली खानच्या कुटुंबाबद्दल सहानुभूती आहे. मात्र जेव्हा सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा संपूर्ण सरकारवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले. मुंबईच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले, मुंबई पोलिसांना बेकार म्हटले गेले. चित्रपटसृष्टीतील बड्या लोकांनी प्रश्न उपस्थित केले. मुख्यमंत्र्यांच्या गृहखात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. अहवालानुसार, सैफवर गंभीर हल्ला झाल्याचे मला दिसत आहे. अडीच इंची चाकू आत घुसला, शस्त्रक्रिया सहा तास चालली. एखादी व्यक्ती चार दिवस उपचार घेते आणि इतकी फिट होऊन घरी जाते. मी डॉक्टरांना देखील विचारतो की हे शक्य आहे का?’ (हेही वाचा: Saif Ali Khan Gets Discharged From Hospital: हल्ल्यानंतर अखेर सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज; पूर्ण विश्रांतीचा सल्ला)

दरम्यान, हल्ल्यानंतर आता सैफ अली खानच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अभिनेत्याच्या घराच्या फ्लोअर डक्टला जाळ्याने पॅक करण्यात आले आहे. सैफ अली खान आणि करीना कपूर खान त्यांची मुले- जेह आणि तैमूरसोबत राहतात. त्यांच्या इमारतीच्या 12 व्या मजल्यावरील सर्व एसी डक्ट क्षेत्र जाळीच्या स्क्रीनने सील करण्यात आले आहेत. सैफवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपी मोहम्मद शहजादला 17 जानेवारी रोजी अटक केली होती. यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now