महेश भट्टकडून कन्या आलियाला बर्थडे गिफ्ट, सडक-२ मधून दिग्दर्शनात घरवापसी

सडक-२ आहे म्हटल्यावर त्यात संजय दत्त आणि पूजा भट्ट तर आलेच. पण, सोबत आदित्य रॉय कपूर आणि आलिया भट्टही चित्रपटात झळकणार आहेत

महेश भट्टकडून कन्या आलियाला बर्थडे गिफ्ट, सडक-२ मधून दिग्दर्शनात घरवापसी
सडक-२ कलाकार (Photo Credits: File Photo)

प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता महेश भट्ट यांनी कन्या आलियाला वाढदिवसानिमित्त एक खास भेट दिली आहे. ज्यामुळे केवळ आलियाच नव्हे तर, महेश भट्ट यांचे चाहतेही भलतेच खूश आहेत. तब्बल दोन दशकांनतर म्हणजे चक्क २० वर्षांनी महेश भट्ट पुन्हा एकदा दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. महत्त्वाचे असे की, महेश भट्ट हे 'सडक-२'साठी दिग्दर्शन करत आहेत. काही वर्षांपूर्वी आलेल्या सडक या चित्रपटाने दमदार कामगिरी केली होती.

दरम्यान, आलिया भट्टने आपल्या ट्विटर हॅंडलवरुन एक फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सडक-२चा आहे. तर, फोटोमध्ये सडकची स्टारकास्ट दिसत आहे. या फोटोत सडकच्या प्रदर्शनाची तारीखही पहायला मिळत आहे. आलिया आणि महेश भट्ट यांच्या चाहत्यांनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे. तर, व्हिडिओ आणि फोटोवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.

सुमारे वीस पंचवीस वर्षांपूर्वी आलेल्या सडक चित्रपटात स्टारकास्ट तगडी होती. आता सडक-२मध्येही स्टारकास्ट तगडी आहे. अर्थात, सडक-२ आहे म्हटल्यावर त्यात संजय दत्त आणि पूजा भट्ट तर आलेच. पण, सोबत आदित्य रॉय कपूर आणि आलिया भट्टही चित्रपटात झळकणार आहेत. सूत्रांची माहिती अशी की, पूजा भट्ट याही चित्रपटात सेक्स वर्करच्याच रोलमध्ये दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

Sadak 2 - A Mahesh Bhatt Film @maheshfilm @poojab1972 @duttsanjay #adityaroykapoor

A post shared by Alia (@aliaabhatt) on

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia (@aliaabhatt) on

आलियाची वडील महेश भट्ट आणि बहिण पूजा सोबत काम करण्याची (स्क्रिन शेअरींग) ही पहिलीच वेळ आहे.

(The above story first appeared on LatestLY on Sep 20, 2018 11:42 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).