Saaho Trailer: प्रभास-शद्धा कपूर स्टारर 'साहो' चित्रपटाचा शानदार ट्रेलर प्रदर्शित, पाहा व्हिडिओ
प्रभास (Prabhas) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) स्टारर 'साहो' (Saaho) चित्रपटाचा शानदार ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
प्रभास (Prabhas) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) स्टारर 'साहो' (Saaho) चित्रपटाचा शानदार ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत होते आणि आज प्रदर्शित करण्यात आल्यानंतर त्यांच्यामध्ये उत्साह दिसून येत आहे. साऊथ चित्रपटाचे दिग्दर्शक सुजीत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
आता पर्यंत या चित्रपटातील कलाकारांच्या लूकचे पोस्टर्स झळकवण्यात आले होते. मात्र आता ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटातील सर्व कलाकारांच्या उपस्थितीत लॉन्च करण्यात आला आहे.(महेश मांजरेकर यांचा Saaho सिनेमातील खलनायकी अंदाजातील दमदार लूक रसिकांच्या भेटीला)
साहो चित्रपटाचा ट्रेलर येथे पाहा:
साहो चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये प्रभास आणि श्रद्धा यांचा धडाकेबाज अंदाज पाहायला मिळत आहे. हा चित्रपट पूर्णपणे थ्रिलर असल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटासाठी 300 करोड रुपयांचे बजेट ठरण्यात आले होते. साहो युवी क्रियेशन आणि टी-सिरिज यांनी मिळून प्रोड्युस केला आहे.
बाहुबली चित्रपटातून गाजलेला प्रभास आता साहो चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदापर्ण करत आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर हिच्यासह जॅकी श्रॉफ, नील नितिन मुकेश, एवलीन शर्मा, चंकी पांडे,मंदिरा बेदी, महेश मांजरेकर यांच्यासह अन्य कलाकार झळकरणार आहेत. येत्या 30 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.