Russia Ukraine War: बॉलिवूडवर रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम, युद्धामुळे उर्वशी रौतेलाच्या चित्रपटाचे शूटिंग थांबले

आता या युद्धामुळे अनेक भारतीय चित्रपटाचे शूटिंग पुढे ढकलण्यात आले आहे. यामध्ये उर्वशी रौतेलाच्याही (Urvashi Rautela) चित्रपटाचे शूटिंग पुढे ढकलण्यात आले आहे.

Urvashi Rautela (Photo Credit - Insta)

सध्या रशिया आणि युक्रेनमधील युद्ध (Russia Ukraine War) जगभरात चर्चेचा विषय आहे. हजारो युक्रेनियन नागरिकांना या युद्धाचा फटका बसला असतानाच त्याचा परिणाम आता विविध क्षेत्रांमध्येही दिसून येत आहे. आता रशिया आणि युक्रेनमधील या युद्धाचा परिणाम बॉलिवूडवरही (Russia-Ukraine War Hits Bollywood) होऊ लागला आहे. युक्रेन आणि रशियामध्ये अनेक भारतीय चित्रपट, वेब सीरिज आणि मालिका शूट झाल्या आहेत. बॉलिवूडसाठी दोन्ही देश शूटिंगची आवडती ठिकाणे आहेत. आता या युद्धामुळे अनेक भारतीय चित्रपटाचे शूटिंग पुढे ढकलण्यात आले आहे. यामध्ये उर्वशी रौतेलाच्याही (Urvashi Rautela) चित्रपटाचे शूटिंग पुढे ढकलण्यात आले आहे.  उर्वशी रौतेला काही दिवसांपूर्वी युक्रेनमधील कीव आणि ओडेसा येथे तिच्या आगामी तमिळ चित्रपटाचे शूटिंग करत होती. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून उर्वशी युक्रेनवर रशियाच्या हल्ल्याच्या 2 दिवस आधी भारतात परतली.

 

View this post on Instagram

 

A post shared by URVASHI RAUTELA 🇮🇳 (@urvashirautela)

उर्वशीने सांगितले की शूटिंग सुरू असताना खूप टेन्शन होते. उर्वशीचा भाऊ युक्रेनमधली परिस्थिती पाहून खूप अस्वस्थ झाला होता, त्याचवेळी तिचे वडील कामासाठी युक्रेनमध्ये हजर होते. असेही सांगण्यात येत आहे की उर्वशी युक्रेनचे पंतप्रधान डेनिस शिमहल यांनाही भेटणार होती परंतु रशियासोबतच्या तणावामुळे ती रद्द करण्यात आली. उर्वशीला वाटते की युद्धापेक्षा वाईट जगात काहीही नाही. युक्रेनमधील लोकांच्या सुरक्षेबाबतही तिने चिंता व्यक्त केली आहे. (हे ही वाचा Baahubali 3: प्रभास आणि राजामौली पुन्हा 'बाहुबली 3'च्या तयारीत! अभिनेता म्हणाला, 'बाहुबलीचा पुढचा भाग लवकरचं येऊ शकतो')

अनेक युक्रेनियन मित्र आणि त्यांची कुटुंबे युक्रेनमध्ये राहतात. याआधी उर्वशी प्रसिद्ध युक्रेनियन गायक दिमित्री मोनाटिकसोबत एका प्रोजेक्टवर काम करणार होती पण युद्धाच्या तणावामुळे ते थांबवण्यात आले आहे. उर्वशीने आशा व्यक्त केली आहे की हे युद्ध लवकरच संपेल, त्यानंतर ती पुन्हा एकदा युक्रेनमध्ये आपले काम सुरू करू शकेल. युद्धात प्राण गमावलेल्या युक्रेनियन नागरिकांबद्दल तिने शोक व्यक्त केला आणि शांततामय जगाची आशा व्यक्त केली.