Riteish Deshmukh याने शेअर केला केदारनाथ मंदिराचा सुंदर व्हिडिओ; पहा विलोभनीय दृश्यं
हा व्हिडिओ केदारनाथ मंदिराचा असून त्यातील दृश्यं विलोभनीय आहे. पहा व्हिडिओ...
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असतो. रितेशचे फोटोज, व्हिडिओज यांना चाहत्यांनाकडून भरभरुन प्रतिसाद मिळत असतो. रितेश आणि जेनेलिया यांच्या जोडीला तर सोशल मीडियावर हिट आहे. दरम्यान, नुकताच रितेशने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ केदारनाथ मंदिराचा (Kedarnath Temple) असून त्यातील दृश्यं विलोभनीय आहे. (रितेश देशमुख ची वडील विलासराव देशमुख यांच्या स्मृतीदिनी खास पोस्ट, Miss You Pappa म्हणत शेअर केला 'हा' फोटो)
"Kedarnath Temple!! Breathtakingly beautiful" असं म्हणत रितेश देशमुख याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यासोबत #omnamahshivay हा हॅशटॅगही जोडला आहे. विशेष म्हणजे व्हिडिओमागे वाजणारी आरती यामुळे सुरेख वातावरण निर्मिती झाली आहे. आभाळ भरुन आल्याने आकाश काळसर निळं दिसत आहे. धुकं अगदी मंदिराच्या कळसापाशी दाटलं आहे. त्यामुळे मंदिर, मागे डोंगर, धुकं आणि त्यावर बर्फाने आच्छादलेला डोंगर असं एकंदर एक विलोभनीय दृश्यं या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. त्यात मंदिराच्या पायऱ्या चढून जाताना भाविक दिसत आहेत.
पहा व्हिडिओ:
विशेष म्हणजे हा व्हिडिओ तासाभरात 65 हजार हून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर त्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. यापूर्वी रितेश देशमुख याने रियान आणि राहिल या आपल्या मुलांसोबत कागदाच्या बोळ्यापासून इको फ्रेंडली गणेश मूर्ती साकारली होती. त्याचा व्हिडिओ देखील रितेशने शेअर केला होता.