रितेश देशमुख घरातील आरसा पुसत असताना स्वत:चा लूक पाहून म्हणाला 'मैं हूं खलनायक', पाहा मजेशीर टिकटॉक व्हिडिओ

हे करत असताना अचानक तो आरशात पाहतो आणि त्याचा एक वेगळा लूक समोर येतो. हा लूक पाहून तो स्वत:ला मैं हू खलनायक असे संबोधत आहे.

Riteish Deshmukh (Photo Credits: Instagram)

लॉकडाऊन मुळे संपूर्ण देशवासियांसह रुपेरी पड्यावरील अनेक कलाकार घरात क्वारंटाईन झाले आहेत. या मोकळ्या वेळेत ते आपल्या कुटूंबासह वेळ घालवत आहे. तसेच आपल्या चाहत्यांसोबत सोशल मिडियाच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सोशल मिडियाचे माध्यम निवडले असून टिकटॉक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ते आपले मजेशीर, धमाल व्हिडिओ शेअर करत आहे. यातच आता अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने आपला एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. या टिकटॉक व्हिडिओमध्ये तुम्ही त्याचा हटके लूक पाहू शकाल.

या व्हिडिओमध्ये रितेश आपल्या घरातील आरसा पुसत आहे. हे करत असताना अचानक तो आरशात पाहतो आणि त्याचा एक वेगळा लूक समोर येतो. हा लूक पाहून तो स्वत:ला मैं हू खलनायक असे संबोधत आहे. Lockdown मुळे घरी असलेल्या रितेश देशमुख कडून पत्नी जेनेलिया ने करुन घेतले 'हे' काम, Watch Viral Tik Tok Video

पाहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

Main Hoon Khalnayak .... #magicmirror designer: @thecrankhead

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd) on

हा व्हिडिओ आतापर्यंत 8 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. काही दिवसांपूर्वी रितेश आणि त्याची पत्नी जेनेलियाने 'साजन' चित्रपटातील संजय दत्त गाजलेले गाणे 'मेरे साजन' या गाण्यावर रोमँटिक अंदाजात आपले प्रेम व्यक्त करत एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाला होता.