रितेश देशमुख आणि जेनेलिया च्या प्रेमाला लॉकडाऊन काळात आला बहर, संजय दत्त च्या लोकप्रिय गाण्यावर बनवला TikTok व्हिडिओ
या व्हिडिओमध्ये रितेश 'साजन' चित्रपटातील संजय दत्त गाजलेले गाणे मेरे साजन या गाण्यावर रोमँटिक अंदाजात जेनेलियासमोर आपले प्रेम व्यक्त करत आहे.
कोविड-19 चा प्रादुभाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. असा स्थितीत सर्व बॉलिवूड कलाकार आपल्या सध्या घरीच आपल्या कुटूंबियांसोबत छान वेळ घालवताना दिसत आहे. आपल्या चाहत्यांसोबत जोडलेले राहण्यासाठी त्या संबंधीचे व्हिडिओ ते सोशल मिडियावर शेअर देखील करत आहे. यात बॉलिवूडच्या क्युट कपल्समध्ये सर्वात जास्त चर्चेत आहेत ते रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलियाची (Genelia) जोडी. आपले एकाहून एक सुंदर, विनोदी टिकटॉक व्हिडिओ शेअर करुन ते आपल्या फॅन्सना खूश ठेवत आहे. नुकताच त्यांनी एक रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये रितेश 'साजन' चित्रपटातील संजय दत्त गाजलेले गाणे मेरे साजन या गाण्यावर रोमँटिक अंदाजात जेनेलियासमोर आपले प्रेम व्यक्त करत आहे. Lockdown मुळे घरी असलेल्या रितेश देशमुख कडून पत्नी जेनेलिया ने करुन घेतले 'हे' काम, Watch Viral Tik Tok Video
पाहा व्हिडिओ:
View this post on Instagram
Love in Lockdown @geneliad ..... favourite song from Saajan.... @madhuridixitnene @duttsanjay
A post shared by Riteish Deshmukh (@riteishd) on
हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला असून या व्हिडिओला लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वी यांनी असाच एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये जेनेलिया रितेश देशमुख कडून घरातील भांडी घासण्याचे काम करुन घेत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. रितेश बिचारा भांडी घासत आहे आणि त्याला दमदाटी करण्यासाठी जेनेलियाने हातात लाटणं घेतले आहे. या व्हिडिओमागे 'मौका मिलेगा तो हम बतादेंगे' हे गाणं खूपच जुळून आले आहे.