कर्करोगाशी लढा देऊन 11 महिने, 11 दिवसांनतर ऋषी कपूर मायदेशी परतले; Watch Video

ऋषी कपूर कर्करोगाशी लढा देत अमेरिकेमध्ये उपचार घेत होते. तब्बल 11 महिने, 11 दिवसांनतर ते घरी परत आले आहेत. त्यांच्या परत येण्याचे कपूर कुटुंबीय आणि त्यांच्या चाहत्यांना फार आनंद झाला आहे.

Rishi Kapoor and Neetu Kapoor (Photo Credits: Yogen Shah)

एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टी गाजवून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) मायदेशी परतले आहेत. ऋषी कपूर कर्करोगाशी लढा देत अमेरिकेमध्ये उपचार घेत होते. तब्बल 11 महिने, 11 दिवसांनतर ते घरी परत आले आहेत. त्यांच्या परत येण्याचे कपूर कुटुंबीय आणि त्यांच्या चाहत्यांना फार आनंद झाला आहे. याबाबत स्वतः ऋषी कपूर यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. आजारपणामुळे ऋषी कपूर आपल्या आईच्या अंत्यसंस्कारालाही उपस्थित राहू शकले नव्हते. आता ते मुंबई मध्ये संजय दत्त सोबत एका चित्रपटाचे शुटींग सुरु करणार आहेत.

ऋषी कपूर ट्विट - 

ऋषी कपूर मागच्या वर्षी जेव्हा अमेरिकेसाठी रवाना झाले होते त्यावेळी त्यांच्याबद्दल कोणतीही पक्की बातमी मिळाली नाही. त्यानंतर ते कर्करोगाशी झुंजत असल्याची माहिती मिळाली. याकाळात अनेक कलाकारांनी त्यांची अमेरिकेत भेट घेतली. आता आपले उपचार संपवून ते मायदेशी परतले आहेत. आपल्या भूमीत परतल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. विमानतळावर त्यांच्यासोबत पत्नी नीतू सिंह (Neetu Kapoor) ही दिसून आल्या.

 

View this post on Instagram

 

Welcome back  #rishikapoor #neetusingh #airportdiaries #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

महत्वाचे म्हणजे ऋषी कपूर यांच्या घरी परत येण्याने रणबीर आणि आलिया यांच्या लग्नाला मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. ऋषी कपूर अमेरिकेत असल्याने हे लग्न लांबणीवर पडत होते. दरम्यान ऋषी कपूर आता 15 दिवस विश्रांती घेणार आहे, त्यानंतर ते पुढच्या चित्रपटाला सुरुवात करतील.