Rishi Kapoor Funeral: अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानंतर करिना कपूर, सैफ, आलिया भट्ट पोहचले Reliance Foundation Hospital मध्ये! चंदनवाडी स्मशानभूमीत होणार अंतिम संस्कार (View Pics)
ऋषि कपूर यांच्या पश्चात त्यांचा मुलगा रणबीर कपूर, पत्नी नितु सिंग आणि मुलगी रिधिमा आहे. रिधिमा दिल्लीहून रस्तेमार्गे दाखल होणार आहे. 18 तासांच्या प्रवासासाठी तिने काल दिल्ली पोलिसांकडून परवानगी घेतली आहे.
Rishi Kapoor Last Rites: बॉलिवूडचा चॉकलेट बॉय ऋषि कपूर (Rishi Kapoor) यांचं आज सकाळी 8.45 च्या सुमारास निधन झालं आहे. दरम्यान मागील दोन वर्षांपासून ते रक्ताच्या कॅन्सरशी झुंज देत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांच्यावर अमेरिकेत उपचार झाले होते. मात्र आज त्यांची कॅन्सरविरूद्धची लढाई अयशस्वी ठरली आहे. सध्या कोरोना व्हायरस लॉकडाऊन असल्याने चाहत्यांना, बॉलिवुड कलाकारांना घराबाहेर पडणं शक्य नाही मात्र कपुर कुटुंबाच्या पाठीशी उभं राहण्यासाठी दक्षिण मुंबईतील Reliance Foundation Hospital मध्ये करिना कपूर (Kareena Kapoor), सैफ अली खान (Saif Ali Khan), अरमान जैन(Arman Jain) , अभिषेक बच्चन (Abhishekh Bachchcan) सह आलिया भट्ट देखील पोहचली आहे. आज थोड्याच वेळात मरिन लाईंस येथील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे. असे मीडिया रिपोर्ट्समधून समोर आलं आहे.
ऋषी कपूर यांच्या अंत्य संस्काराच्या वेळेस मोजके 20 जण उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आज सकाळी कपूर कुटुंबाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका नोटमध्ये चाहत्यांनी अंत्यविधी आणि अंतिम संस्काराच्या वेळेस गर्दी करू नका. ऋषि कपूर यांना साश्रू नयनांनी नव्हे तर स्मितहास्याने अलविदा करावं अशी त्यांची इच्छा होती असं सांगण्यात आलं आहे. ऋषी कपूर यांच्या निधनाच्या वृत्ताने बॉलिवूड हळहळले; प्रियंका चोप्रा, रजनीकांत, अक्षय कुमार, अजय देवगण यांनी ट्वीटरच्या माध्यमातून अर्पण केली आदरांजली.
Reliance Foundation Hospital मध्ये सेलिब्रिटी दाखल
ऋषि कपूर यांच्या पश्चात त्यांचा मुलगा रणबीर कपूर, पत्नी नितु सिंग आणि मुलगी रिधिमा आहे. रिधिमा दिल्लीहून रस्तेमार्गे दाखल होणार आहे. 18 तासांच्या प्रवासासाठी तिने काल दिल्ली पोलिसांकडून परवानगी घेतली आहे. ऋषी कपूर यांचे स्नेही आणि बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी I am destroyed असं म्हणत ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी शेअर केली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)