Rhea Chakrobarty (Photo Credits: Youtube)

Rhea Chakraborty Viral Video: सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Death Case) याच्या मृत्यु प्रकरणात त्याच्या अनेक फॅन्सनी सुशांत ची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakrobarty) हिला अगोदरच दोषी ठरवले आहे. अलिकडे तर सोशल मीडियावर सुरु असणार्‍या अनेक पोस्टस मधुन रियाचा धिक्कार करणे सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर या ना त्या कारणाने सतत रिया चक्रवर्तीचे नाव चर्चेत राहिले आहे. आता काही जणांंनी रियाचा एक जुना सिनेमा बॅंक चोर  (Bank Chor) शोधुन काढत यावर मीम्स बनवायला सुरुवात केली आहे. या सिनेमातील एक सीन ज्यात रिया पत्रकार अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांंना स्वतःचा आदर्श असल्याचे म्हणत डायलॉग मारताना दिसत आहे. आता याला आपण योगायोग म्हणायचे की आणखीन काही पण हा सीन आता सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे.

Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीला शवगृहात प्रवेश दिल्याने महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाकडून कपूर रुग्णालय, मुंबई पोलिसांना नोटीस

बॅंक चोर या सिनेमात रियाने पत्रकार गायत्री गांगुली हे पात्र साकारले होते, आता व्हायरल होणार्‍या बसीन मध्ये रिया (गायत्री) आर्गो अशा नावाचा उल्लेख करते जेव्हा तिला याविषयी विचारता ती आर्गो हे अर्णब गोस्वामी नावाचे शॉर्ट फॉर्म असल्याचे सांंगते. तसेच तो आपला आदर्श असल्याचे म्हणते. या सिनेमात रियासोबतच रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय, विक्रम थापा ही मंंडळी सुद्धा प्रमुख भुमिकेत आहेत.

पहा रिया चक्रवर्ती चा व्हायरल व्हिडिओ

दरम्यान,सुशांंतच्या प्रकरणात सीबीआय चौकशी सुरु आहे, पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी हा खटला उचलुन धरला आहे त्यामुळेच रियाचा हा व्हिडिओ लक्ष वेधुन घेत आहे.