Satta Matka King Movie: Nora Fatehi ने Matka चित्रपटासाठी शूट केले रेट्रो थीम गाणे; Varun Tej च्या चित्रपटाने RFC शेड्यूल केले पूर्ण (See Pic)
नोरा सध्या 'मटका' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती वरुण तेजसोबत दिसणार आहे. नोरा फतेहीने चित्रपटासाठी एक दमदार रेट्रो थीम सॉन्ग शूट केले आहे.
Satta Matka King Movie: बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) आगामी बिग बजेट तेलुगू चित्रपट 'मटका' (Matka Movie) मध्ये प्रमुख भूमिका साकारत तेलगू चित्रपट उद्योगात एक प्रमुख अभिनेत्री म्हणून आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज आहे. नोरा सध्या 'मटका' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती वरुण तेजसोबत दिसणार आहे. नोरा फतेहीने चित्रपटासाठी एक दमदार रेट्रो थीम सॉन्ग शूट केले आहे, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे गाणे 70 च्या दशकातील डिस्को म्युझिकपासून प्रेरित आहे. यात नोरा फतेहीने शानदार डान्स केला आहे. हे गाणे आरएफसी हैदराबाद येथे एका खास सेटवर चित्रित करण्यात आले असून नोरा फतेही रेट्रो लूकमध्ये दिसत आहे.
मटका चित्रपटासाठी हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटी (RFC) येथे विस्तृत सेट्स बांधण्यात आला आहे. यासाठी 15 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. विझागमध्ये 'मटका'चे नवीन शेड्यूल जोरात सुरू असल्याचेही चित्रपट निर्मात्यांनी जाहीर केले आहे. वरुण तेज या चित्रपटात त्याची आजपर्यंतची सर्वात आव्हानात्मक भूमिका साकारत आहे. ज्यासाठी त्याला अनेक मेकओव्हरची आवश्यकता आहे. कारण, या चित्रपटाची कथा 1958 ते 1982 पर्यंत 24 वर्षांचा प्रवास करते. (हेही वाचा -Nora Fatehi Slams Paparazzi: नोरा फतेहीने तिचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो काढल्या बद्दल पापाराझीची केली निंदा)
'मटका'मध्ये नोराचा जलवा -
View this post on Instagram
या चित्रपटातील दुसरी लीड अभिनेत्री मीनाक्षी चौधरी आहे. 'मटका' वरुण तेजच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा चित्रपट ठरणार आहे. हा चित्रपट चाहत्यांना थ्रिलचा भारी डोस देणार आहे. करुणा कुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Jul 23, 2024 02:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

