Ranveer Singh चे छोट्या पडद्यावर पर्दापण; 'हा' TV Show करणार होस्ट
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह अभिनय, हटके स्टाईल आणि नटखट अंदाज यामुळे चर्चेत असतो. त्याचा कॉमिक अंदाज अनेकांची मनं जिंकतो. मोठ्या पदड्यावर आपली कला सादर केल्यानंतर रणवीर आपल्या चाहत्यांसाठी एक सुखद बातमी घेऊन आला आहे.
Ranveer Singh Makes TV Debut: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह दमदार अभिनय, हटके स्टाईल आणि नटखट अंदाज यामुळे चर्चेत असतो. त्याचा कॉमिक अंदाज अनेकांची मनं जिंकतो. मोठ्या पदड्यावर आपली कला सादर केल्यानंतर रणवीर आपल्या चाहत्यांसाठी एक सुखद बातमी घेऊन आला आहे. लवकरच रणवीर छोट्या पदड्यावर पर्दापण करणार आहे. यासाठी त्याने कलर्स टीव्ही (Colors Tv) सोबत हातमिळवणी केली आहे. कोविड-19 संकटात सिनेमागृह बंद असल्याने आपले लाडक्या कलाकारांना मोठ्या पदड्यावर पाहता येत नाही. अशावेळी टीव्ही डेब्यू करत रणवीर सिंह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खरंतर रणवीर सिंहने अगदी योग्य वेळ साधली आहे.
रणवीर सिंह छोट्या पडद्यावर पर्दापण करत असल्याची माहिती फ्लिम ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श याने ट्विट करत दिली आहे. कलर्स टीव्ही च्या 'द बिग पिक्चर' (The Big Picture) हा क्विज शो रणवीर होस्ट करणार आहे. कलर्स टीव्हीची व्हुअरशीप तगडी असून हिंदी मनोरंजन विश्वात याचे नाव उच्च स्थानावर आहे. (Ranveer Singh New Film Cirkus: रणवीर सिंह-रोहित शेट्टी ही जोडी पुन्हा येणार एकत्र; पूजा हेगडे जैकलीन फर्नांडिससह दाखवणार 'सर्कस')
Taran Adarsh Tweet:
यापूर्वी बॉलिवूडच्या अनेक टॉप अभिनेत्यांनी टीव्ही शो मध्ये आपली वर्णी लावली आहे. अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती', सलमान खान 'दस का दम' आणि 'बिग बॉस', शाहरुख खान 'क्या अप पांचवी पास से तज हैं' आणि 'केबीसी' यांसारखे शोज होस्ट केले आहेत. आता रणवीरने देखील छोट्या पडद्यावर नशीब आजमावून पाहत आहेत. दरम्यान, प्रेक्षकांना त्याच्या दीपिका पदुकोण सोबतच्या '83' सिनेमाच्या प्रदर्शनाची प्रतिक्षा आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)