रणवीर सिंहच्या नव्या चित्रपटाची घोषणा, 'जयेशभाई जोरदार' ह्या चित्रपटात रणवीर दिसणार प्रथमच गुज्जू भाईच्या भूमिकेत
रणवीर सिंह चा नवा चित्रपट 'जयेशभाई जोरदार' ह्या चित्रपटाची घोषणा
बाजीराव, अल्लाउद्दीन खिल्जी आणि सिम्बा ह्या भूमिकांमधून आपली स्वत:ची अशी वेगळी छाप सोडलेला अभिनेता रणवीर सिंह लवकरच आपल्या समोर एका गुज्जू भाईच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकत्याच त्याच्या ह्या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. ह्या चित्रपटाचे नाव आहे 'जयेशभाई जोरदार'(JayeshBhai Jordar). चित्रपटाच्या नावावरुनच हा गुजराती व्यक्तीवर आधारित चित्रपट असेल असंच दिसतय. यश राज फिल्मच्या बॅनरखाली हा चित्रपट आपल्या भेटीला येईल. लवकरच ह्या चित्रपटाचे शूटिंग सुरु होईल. नुकताच रणवीर सिंह ने ह्या चित्रपटाची घोषणा करणारा गुजराती भाषेतील एक व्हिडियो आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला.
यशराज फिल्म्सचा 'बँड बाजा बारात ' (Band Baaja Baaraat) ह्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री करणारा अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) पुन्हा एकदा ह्याच बॅनरखाली आपला आणखी एक नवा चित्रपट घेऊन येतआहे. या चित्रपटाची निर्मिती मनिष शर्मा करणार असून, दिव्यांग ठाकूर ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. हा एक कॉमेडी चित्रपट असेल.
रणवीर ह्या आधी नकारात्मक, खलनायिक, गंभीर, सामान्य माणसाच्या भूमिकेत आपल्याला दिसला. मात्र आता प्रथमच तरुणींच्या गळ्यातला ताईत असलेला रणवीर आपल्याला गुजराती माणसाच्या भूमिकेत दिसणार आहे. ऑफस्क्रीन खूपच मिश्किल स्वभावाचा असलेला रणवीर प्रथमच एका विनोदी चित्रपटात दिसणार असल्यामुळे रणवीर कॉमिक टायमिंगचं शिवधनुष्य कसे पेलेल ह्या बाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
'83' सिनेमात कपिल देव यांची भूमिका साकारण्यासाठी रणवीर सिंग याची जीवतोड मेहनत (Watch Video)
रणवीर ने या आधी किल दिल(Kill Dil), बेफिक्रे(Befikre), लेडीज वर्सेस रिकी बेहल(Ladies vs Ricky Bahl), गुंडे(Gundey) यांसारखे यश राज फिल्म्सच्या बॅनरखाली एकाहून एक सरस चित्रपट दिले आहेत. तसेच संजय लीला भन्साळींसोबत केलेले 'गोलियों की रासलीला-रामलीला'(Goliyon Ki Rasleela Ram-Leela), बाजीराव मस्तानी(Bajirao Mastani), पद्मावत(Padmaavat) यांत त्याने साकारलेल्या भूमिका विशेष गाजल्या.
ऑक्टोबर महिन्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल. सध्या रणवीर '83' ह्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. लवकरच ह्या चित्रपटाचे शूटिंग संपवून रणवीर 'जयेशभाई जोरदार' ह्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल.