रणबीर ने वडील ऋषि कपूर यांच्या अस्थी मुंबईतील बाणगंगा तलावात विसर्जित करून दिला अखेरचा निरोप (Watch Video)
दिवंगत अभिनेते ऋषि कपूर (Rishi Kapoor) यांच्या अस्थी त्यांचा मुलगा आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांनी मुंबईतील बाणगंगा तलावात (Banganga Talao) विसर्जित करून त्यांना अखेरचा निरोप दिला आहे
दिवंगत अभिनेते ऋषि कपूर (Rishi Kapoor) यांच्या अस्थी त्यांचा मुलगा आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांनी मुंबईतील बाणगंगा तलावात (Banganga Talao) विसर्जित करून त्यांना अखेरचा निरोप दिला आहे. रविवारी यासाठी रणबीर बाणगंगा येथे गेला होता. यावेळी अनेकांनी त्यांचे फोटोस व व्हिडीओ काढून सोशल मीडियावर शेअर केले आहेत, या व्हिडीओजमध्ये रणबीर कपूर याच्या सोबत ऋषी कपूर यांची पत्नी नीतू कपूर (Neetu Kapoor), मुलगी रिद्धिमा कपूर (Riddhima Kapoor), अयान मुखर्जीं (Ayan Mukharjee) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) सुद्धा पाहायला मिळत आहेत. याआधी शनिवारी 2 मे रोजी कपूर यांच्या बंगल्यावर ऋषी कपूर यांच्या स्मृतीस आठवत प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती.
ऋषी कपूर यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी नीतू कपूर यांनी अलीकडेच त्यांचा एक फोटो शेअर करत आमची कहाणी संपली अशी भावुक पोस्ट केली होती. तर बॉलिवूड मधील सुद्धा अनेकांनी ऋषी कपूर यांच्या आठवणी शेअर करून त्यांच्या जाणायचे दुःख व्यक्त केले होते. या सर्व प्रसंगात रणबीर हा बराच संयमी आणि धैर्याने वागत आहे. आई, बहीण आणि संपूर्ण कुटुंबाला तो धीर देत आहे. यावरून त्याच्या चाहत्यांनी व अन्य कलाकारांनीही त्याचे बरेच कौतुक केले आहे.
ऋषी कपूर यांच्या अस्थींचे विसर्जन, पहा व्हिडीओ
ऋषि कपूर यांना श्वास घेताना त्रास होऊ लागल्याने त्यांना बुधवारी 29 एप्रिल च्या रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आली. मात्र गुरुवारी म्हणजेच 30 एप्रिल रोजी त्यांचे निधन झाले. ऋषी कपूर हे 67 वर्षाचे होते आणि 2018 पासून ते कॅन्सरशी झुंज देत होते, अखेरीस 30 एप्रिलला त्यांची ही झुंज अयशस्वी ठरली आणि त्यांचा मृत्यू झाला.