लव रंजनच्या आगामी चित्रपटात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर एकत्र झळकणार

या चित्रपटात रणबीरसोबत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण दिसणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र, आता या चित्रपटात श्रद्धा कपूरची वर्णी लागली आहे.

Ranbir Kapoor, Shraddha Kapoor (PC-Instagram)

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) ही जोडी लव रंजनच्या (Luv Ranjan) आगामी चित्रपटात एकत्र पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात रणबीरसोबत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण दिसणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र, आता या चित्रपटात श्रद्धा कपूरची वर्णी लागली आहे.

चित्रपट विश्लेषक तरण आदर्शने याबद्दल माहिती दिली आहे. हा चित्रपट 26 मार्च 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे. अद्याप या चित्रपटाने नाव जाहीर करण्यात आलेले नाही.  या चित्रपटाची निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्ग करणार आहेत. रणबीर कपूर सध्या ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘शमशेर’ या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. दीपिकाबरोबर अजय देवगन याचादेखील या चित्रपटात समावेश होता. परंतु, काही मतभेदामुळे अजय देवगणने या सिनेमासाठी नकार दिला. तसेच काही दिवसांपूर्वी दीपिकाने लव रंजनची भेट घेतली होती. त्यानंतर दीपिकाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. मी टु मोहिमेत लव रंजन याचं नाव होतं. त्यामुळे अशा व्यक्तीसोबत दीपिकाने काम करू नये, असा सल्ला तिच्या चाहत्यांनी दिला होता. (हेही वाचा - बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी 13 वर्षांनंतर 'निकम्मा' चित्रपटातून करणार कमबॅक)

श्रद्धा कपूरने आपल्या ट्विटर हँडलवरून लव रंजनच्या चित्रपटात काम करण्यासाठी उत्सुक असल्याचं सांगितलं आहे. श्रद्धा कपूर या चित्रपटाव्यतिरिक्त वरुण धवनसोबत 'स्ट्रीट डान्स 3 डी' या आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif