अभिनेत्री Samantha Akkineni च्या शो मध्ये Rana Daggubati ने आपल्या आजाराविषयी केला मोठा खुलासा, ऐकून तुम्हालाही होतील अश्रू अनावर, Watch Video
2 वर्षांपूर्वी महिन्यांपूर्वी राणाची प्रकृती इतकी खालावली होती त्याला 70% स्ट्रोक वा हॅमरेज होण्याची तर 30% थेट मृत्यूची शक्यता डॉक्टरांनी वर्तविली होती. हे ऐकून त्याच्या चाहत्यांच्या पायाखालची जमिनच सरकली.
बाहुबली फेम राणा दग्गुबाती (Rana Daggubati) याने अलीकडे टॉलिवूड अभिनेत्री सामन्था अक्किनेनी (Samantha Akkineni) हिच्या एका चॅट शो मध्ये आपल्या मधल्या काळात झालेल्या आजाराबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. हा खुलासा करताना स्वत: राणाला, समन्था आणि या चॅट शो मध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना देखील अश्रू आवरले नाही. 2 वर्षांपूर्वी महिन्यांपूर्वी राणाची प्रकृती इतकी खालावली होती त्याला 70% स्ट्रोक वा हॅमरेज होण्याची तर 30% थेट मृत्यूची शक्यता डॉक्टरांनी वर्तविली होती. हे ऐकून त्याच्या चाहत्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. राणाची शारीरिक अवस्था पाहून याबाबत चर्चा होऊ लागली होती. त्यावर अखेर राणाने मौन सोडले आहे.
राणा दग्गुबाती सामन्थाच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. या शो मध्ये सामन्था त्या शरीरस्वास्थ्याबद्दल विचारले असता, "आयुष्य जेव्हा फास्ट फॉरवर्डमध्ये धावत असतं, तेव्हा अचानक एक पॉझ बटन लागतं. ब्लड प्रेशरचा त्रास होता, हृदयाभोवती कॅल्शियमचं आवरण तयार झालं होतं. किडनी फेल झाली होती. 70 टक्के स्ट्रोक किंवा हॅमरेजची भीती होती, तर 30 टक्के थेट मृत्यूची शक्यता वर्तवली होती." असं राणाने सांगितले.हेदेखील वाचा- Rana Daggubati-Miheeka Bajaj Wedding Photos: राणा दग्गुबाती-मिहिका बजाज यांचा विवाहसोहळा संपन्न; पाहा या लग्नसोहळ्याचे टिपलेले सुरेख क्षण, Watch Photos
पाहा व्हिडिओ
सामन्था सॅम जॅम या कार्यक्रमात राणाने हा मोठा खुलासा केला आहे. त्याचा हा प्रसंग आठवून "तुझ्याभोवती अनक जण कुरबुर करत होते, पण तू खडकासारखा निश्चल होतास, मी हे माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे आणि म्हणूनच तू माझ्यासाठी सुपरहिरो आहेस" अशा भावना भावूक झालेल्या सामन्थाने व्यक्त केल्या.
दोन वर्षांपूर्वी राणाचा बारीक झालेला फोटो पाहून सर्व अवाक् झाले होते. त्यावेळी राणाने मी बरा असून मला थोडा उच्च रक्तदाबाचा त्रास झाला आहे आणि लवकरच बरा होईन असे सांगितले होते.
(The above story first appeared on LatestLY on Nov 24, 2020 03:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

