Ram Charan On Virat Kohli Biopic: विराट कोहलीच्या बायोपिकमध्ये दिसणार राम चरण? अभिनेता म्हणाला, 'मी त्याच्यासारखाच दिसतो'
अभिनेता राम चरणनेही मीडियाशी खुलेपणाने संवाद साधला. एका मीडिया संस्थेला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता राम चरणने सांगितले की, त्याला स्पोर्ट्स फिल्म करण्यात रस आहे. मोठ्या पडद्यावर भारतीय क्रिकेटर विराट कोहलीची भूमिका साकारायला आवडेल का, असे जेव्हा अभिनेत्याला विचारण्यात आले तेव्हा त्याने होकारार्थी उत्तर दिले.
Ram Charan On Virat Kohli Biopic: एसएस राजामौली (S. S. Rajamouli) यांच्या RRR च्या नाटू-नाटू गाण्याने 'सर्वोत्कृष्ट मूळ गाणे' श्रेणीत ऑस्कर पुरस्कार जिंकला. याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटत आहे. सध्या सर्वत्र नाटू-नाटू गाण्याची क्रेझ दिसत आहे. यामुळे RRR ची संपूर्ण टीम खूप खूश आहे. ऑस्कर पुरस्कार जिंकल्यानंतर RR च्या संपूर्ण टीमचे अनेक मोठ्या राजकारणी ते सेलिब्रिटींनी अभिनंदन केले. जेव्हापासून RRRची टीम भारतात परतली आहे, तेव्हापासून ते आपला आनंद आणि इच्छा मीडियासमोर उघडपणे व्यक्त करत आहेत. अशातच राम चरण (Ram Charan) ने दिल्लीतील एका कॉन्क्लेव्हमध्ये भाग घेतला, जिथे त्याने स्वतःशी संबंधित अनेक खुलासे केले.
यादरम्यान अभिनेता राम चरणनेही मीडियाशी खुलेपणाने संवाद साधला. एका मीडिया संस्थेला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता राम चरणने सांगितले की, त्याला स्पोर्ट्स फिल्म करण्यात रस आहे. मोठ्या पडद्यावर भारतीय क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) ची भूमिका साकारायला आवडेल का, असे जेव्हा अभिनेत्याला विचारण्यात आले तेव्हा त्याने होकारार्थी उत्तर दिले, 'छान. तो एक प्रेरणादायी आत्मा आहे. तो खूप प्रेरणा देतो. मला वाटते की संधी दिल्यास ते खूप चांगले होईल, कारण मी देखील तसाच दिसतो.' (हेही वाचा - Guneet Monga: ऑस्करच्या मंचावर गुनीत मोंगा यांच्यासोबत भेदभाव; पुरस्कार मिळाल्यानंतर भाषण करण्यापासून रोखण्यात आलं, Watch Video)
तथापी, विराट कोहलीवरही RRR च्या नाटू-नाटू गाण्याची क्रेझही पाहायला मिळत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान विराट नाटू-नाटूची हुक स्टेप करताना दिसला. मुलाखतीदरम्यान राम चरणने त्याचा आवडता बॉलीवूड अभिनेता सलमान खानबद्दलही सांगितले. त्याने सलमान खानसोबतची पहिली भेटही उघड केली. राम चरणचे वडील, मेगास्टार चिरंजीवी यांचा सलमान खान खूप चांगला मित्र आहे. यासोबतच राम चरणने आपल्या हॉलिवूड आकांक्षांबद्दलही सांगितले. मात्र, त्यांनी यावेळी कोणतीही माहिती देण्याचे टाळले.
रामचरणच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे तर तो एका राजकीय थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. RC 15 असे या चित्रपटाचे नाव आहे, जो 2024 मध्ये मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होऊ शकतो. याशिवाय रामचरण पुन्हा एकदा सलमान खानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. यापूर्वी रामचरणने जंजीर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)