Rakhi Sawant ला व्हायचयं आई; म्हणाली, मला विकी डोनर नको तर मुलासाठी चांगला बाप हवा आहे

यावेळी तिने बिग बॉस 14 च्या घरातील आपले अनुभवही सांगितले.

राखी सावंत (Photo Credits: Yogen Shah)

बिग बॉस 14 या रिअॅलिटी शोची विजेती टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलैक बनली आहे. या शोमध्ये तिच्यासमवेत राहुल वैद्य, निक्की तांबोळी, अली गोनी आणि राखी सावंत (Rakhi Sawant) हे स्पर्धतदेखील सहभागी होते. शोमध्ये असताना या सर्वांनी लोकांचे भरपूर मनोरंजन केले. बिग बॉस 14 मध्ये राखी सावंतने खेळ आणि डावपेचांशिवाय प्रेक्षकांचे मनोरंजन केले. शोमध्ये असताना राखी सावंतने स्टेटमेंट्ससह तिच्या सीक्रेट वेडिंगसंदर्भात माहिती दिली. त्यामुळे ती चर्चेचा विषय बनली.

आता बिग बॉस 14 मधून बाहेर पडल्यानंतर राखी सावंतने आणखी एक मोठे विधान केले आहे. ज्याची सध्या बरीच चर्चा होत आहे. राखी सावंतने आई होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण, तिला आपल्या मुलासाठी विकी डोनर नव्हे, तर चांगल्या वडिलांचा शोध घेत आहे. बिग बॉस 14 मधून बाहेर आल्यानंतर इंग्रजी वेबसाइट टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना राखी सावंत यांनी यासंदर्भात सांगितलं. यावेळी तिने बिग बॉस 14 च्या घरातील आपले अनुभव सांगितले. तसेच, वैयक्तिक जीवनाबद्दल काही गोष्टींविषयी माहिती दिली. आई होण्याची इच्छा व्यक्त करताना राखी सावंत म्हणाली की, आई बनणे हे तिच्या आयुष्यातील प्राथमिकता आहे. परंतु, तिला मुलासाठी चांगल्या वडिलांची गरज आहे. (वाचा - Bigg Boss 14 Winner: रुबिना दिलैक बनली बिग बॉस 14 ची विजेती; सिद्धार्थ शुक्ला, विकास गुप्ता आणि हिना खान यांनी 'अशी' दिली प्रतिक्रिया)

राखी सावंत म्हणाली की, 'आता माझे प्राधान्य म्हणजे आई बनणे आणि मातृत्व जाणणे होय. मला माझ्या मुलासाठी विकी डोनर नको आहे, परंतु मला त्याच्यासाठी वडील पाहिजे आहेत. ' मला एकटी आई व्हायचं नाही. ते कसं होईल हे मला माहित नाही. परंतु, तसे व्हावे ही माझी खरोखर इच्छा आहे. कारण, महत्त्वपूर्ण म्हणजे राखी सावंतने बिग बॉस 14 च्या घरात दावा केला आहे की, तिचे लग्न झाले आहे. तिच्या नवऱ्याचे नाव रितेश आहे. तथापि, राखीने असेही सांगितले की, रितेशने लग्नानंतर तिला सोडलं.