केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासमोर राखीचा जलवा; केली दिलखुलास तारीफ (Video)

आता या ड्रामा क्वीनने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. यामध्ये राखी चक्क केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांच्यासोबत एकाच मंचावर दिसून येत आहे.

राखी सावंत आणि रामदास आठवले (संग्रहित संपादित प्रतिमा)

आपली वक्त्यव्ये, करामती, अभिनय यांमुळे सतत चर्चेत राहणाऱ्या राखी सावंतने (Rakhi Sawant) बोल्ड फोटोज, सेक्सी व्हिडीओ, अंगप्रदर्शन यांच्या जोरावर स्वतःचा असा चाहता वर्ग निर्माण केला आहे. राखी सावंत सोशल मीडियावर फारच सक्रिय आहे. आता या ड्रामा क्वीनने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. यामध्ये राखी चक्क केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांच्यासोबत एकाच मंचावर दिसून येत आहे. एका फोटोमध्ये तर रामदास आठवले आणि राखी यांना एकच हार घातल्याचे पाहायला मिळते.

हे फोटो केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या मुलाला रिपब्लिकन पार्टीचा लीडर बनवल्यानंतरच्या कार्यक्रमातले आहेत. यामध्ये राखी पूर्णतः सिल्व्हर लुकमध्ये दिसून आली. साडी नेसलेल्या राखीचा मेकअप आणि दागिने याची चांगलीच चर्चा रंगली आहे. या कार्यक्रमावेळी राखीने अगदी दिलखुलासपणे रामदास आठवले यांची तारीफ केली. तर दुसरीकडे पहिल्यांदाच युजर्स राखीबद्दल चांगले बोलताना दिसत आहेत. अनेक युजर्सनी या लुकची तारीफ केली आहे. (हेही वाचा: राखी सावंत मानाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित; ठरली 'Best Item Dancer in Bollywood')

मिका सिंगच्या कीस पासून ते बिग बॉस, विविध आयटम नंबर्स, तनुश्री दत्ता प्रकरण आणि एका परदेशी महिला कुस्तीपटूकडून खाल्लेला मार, अशा अनेक गोष्टींनी राखीची कारकीर्द गाजली आहे. नुकत्याच आपल्या भोजपुरी आयटम नंबर नंतर, राखी मनमोहिनी या मालिकेत दिसून आली होती. त्यानंतर आता ती बॉक्स क्रिकेट लीग - सीझन 4  (Box Cricket League - Season 4) चे निवेदन करत आहे.