Raju Srivastava Health Update: राजू श्रीवास्तवचा बीपी आणि ऑक्सिजन लेव्हल नॉर्मल; आज व्हेंटिलेटरचा सपोर्ट काढण्याची शक्यता
पद्म श्रीवास्तव आणि डॉ. अचल श्रीवास्तव यांच्या देखरेखीखाली दिल्लीतील एम्समध्ये राजूवर उपचार सुरू आहेत. आता राजूचे संपूर्ण शरीर व्यवस्थित काम करत असल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे.
Raju Srivastava Health Update: कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) च्या कुटुंबासाठी आणि चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. दिल्ली एम्सचे डॉक्टर व्हेंटिलेटर सपोर्ट काढून टाकण्याच्या विचारात आहेत. माध्यमांशी संवाद साधताना राजूच्या भावाने सांगितले की, आता राजूच्या हृदयाचे ठोके, रक्तदाब आणि ऑक्सिजनची पातळी सामान्य आहे. त्यामुळेच राजू श्रीवास्तव यांना व्हेंटिलेटर सपोर्टवरून काढून टाकण्याचा निर्णय डॉक्टर घेऊ शकतात.
दरम्यान, 10 ऑगस्टपासून रुग्णालयात दाखल असलेले राजू श्रीवास्तव व्हेंटिलेटरवर आहेत. मात्र, कॉमेडियनच्या प्रकृतीत झालेली सुधारणा पाहता डॉक्टरांनी मंगळवारी व्हेंटिलेटरचा आधार तात्पुरता काढून टाकला होता. मात्र, काही वेळाने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. याआधीही दोनदा व्हेंटिलेटर काही काळासाठी काढण्यात आले आहे. पण, आता राजू नैसर्गिकरित्या 90 टक्के ऑक्सिजन घेत असल्याने डॉक्टर व्हेंटिलेटरचा सपोर्ट पूर्णपणे काढून टाकण्याच्या विचारात आहेत. (हेही वाचा - Kartik Aaryan Visits Lalbaugcha Raja: गणेश चतुर्थीला 'लालबागच्या राजा'च्या दर्शनासाठी पोहोचला कार्तिक आर्यन, See Photos)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एसओडी डॉ. पद्म श्रीवास्तव आणि डॉ. अचल श्रीवास्तव यांच्या देखरेखीखाली दिल्लीतील एम्समध्ये राजूवर उपचार सुरू आहेत. आता राजूचे संपूर्ण शरीर व्यवस्थित काम करत असल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे. मात्र, 10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ते शुद्धीवर आलेले नाही. जवळच्या नातेवाईकांचे आणि राजूला शुद्धीवर आणण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, कॉमेडियनला शुद्धीवर येण्यासाठी 10 किंवा त्याहून अधिक दिवस लागू शकतात.
राजूच्या घरच्यांपासून ते त्याच्या चाहत्यांपर्यंत सर्वजण त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील राजूच्या घरी पाच पंडित महामृत्युंजयचा जप करत आहेत. राजूच्या उत्तम आरोग्यासाठी 1.25 लाख वेळा महामृत्युंजयाचा जप केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.