Roohi Motion Poster: राजकुमार राव आणि जान्हवी कपूर स्टारर 'रूही' चित्रपटाचे पोस्टर आले समोर

स्त्री या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिल्यानंतर सर्व प्रेक्षक रूही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.

Roohi Motion Poster (Photo Credits: Instgram)

अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि श्रद्धा कपूर स्टारर 2018 मध्ये आलेल्या हॉरर कॉमेडी चित्रपट 'स्त्री' ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता त्याच धर्तीवर राजकुमार राव आणि जान्हवी कपूरचा (Janhavi Kapoor) 'रुही' (Roohi) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्री जान्हवी कपूरने आपल्या सोशल अकाउंटवरुन या सिनेमाचा टीजर प्रदर्शित केला आहे. याआधी या सिनेमाचे 'रुही-आफजा' असं या सिनेमाचं नाव यापूर्वी ठरवण्यात आलं होतं. आता 'रुही' असं या सिनेमाचं नावं बदलण्यात आलं आहे. या सिनेमाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आहे. 16 फेब्रुवारीला 'रुही' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

येत्या 11 मार्चला हा सिनेमा सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. स्त्री या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिल्यानंतर सर्व प्रेक्षक रूही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.हेदेखील वाचा- Timepass 3: आईबाबा आणि साईबाबा शप्पथ! टाईमपास 3 येतोय, दिग्दर्शक रवी जाधव यांनी केली घोषणा

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

"भूतिया शादी में आपका स्वागत है" असं कॅप्शन देत 'रुही' सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. राजकुमार रावचा हा दुसरा हॉरर कॉमेडी सिनेमा आहे.

रुही या सिनेमात राजकुमार राव आणि जान्हवी कपूरसह वरुण शर्मा, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. हार्दिक मेहता यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.