Happy Birthday Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टी च्या वाढदिवसानिमित्त पती राज कुंद्रा ने पोस्ट केला एक रोमँटिक व्हिडिओ, हटके स्टाईलमध्ये दिल्या शुभेच्छा
तसेच या पोस्ट मध्ये त्याने एका हटके अंदाजात आपल्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
बॉलिवूडची हॉट अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा आज 45 वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त आज जगभरातील तिचे चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. सोशल मिडियाच्या माध्यमातून तर असंख्य चाहते तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. या चाहत्यांसोहत शिल्पाचा एक मोठा चाहता म्हणजे तिचा नवरा राज कुंद्रा. आज शिल्पा शेट्टीच्या वाढदिवसानिमित्त राज कुंद्रा (Raj Kundra) ने शिल्पासोबतच्या फोटोंचा एक रोमँटिक व्हिडिओ बनवला आहे. तसेच या पोस्ट मध्ये त्याने एका हटके अंदाजात आपल्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राज कुंद्रा ने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 'माझ्या प्रिय पत्नीसाठी... तू माझ्या आयुष्यातील ती व्यक्ती आहेस जिने माझ्यातील उणिवा भरून काढल्या. माझ्या अंध:कार दिवसात तुझ्या हसण्याने प्रकाश पसरवला आहे. तू माझ्या मुलांची केवळ आई नाहीस तर माझ्या जीवनातील राणी माल हृदय आहेस. मी शब्दांच्या पलीकडेही तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो. Happy Birthday meri Jaan' असे राज ने या पोस्ट खाली लिहिले आहे. शिल्पा शेट्टी हिने Surrogacy चा पर्याय निवडण्यामागचं सांगितलं कारण; वाचा मातृत्व मिळवण्याची 'ती'ची कहाणी
राज कुंद्राच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटीज ने कमेंट करुन शिल्पा शेट्टीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिल्पा शेट्टी बद्दल सांगायचे झाले तर शिल्पा ने अभिनेत्रीसह एक उत्तम बिझनेस वुमन आणि फिटनेस आयकॉन म्हणून सुद्धा आपली ओळख बनवली आहे.
Shilpa Shetty Birthday Special: शिल्पाचे जूने फोटो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही - Watch Video
आपल्या सोशल मिडिया अॅपवरून ती आपल्या चाहत्यांना फिटनेसच्या टिप्स देते. शिल्पा शेट्टी हिची बॉलिवूडपासून ते एक फिटनेस आयकॉनपर्यंतची कारकिर्द खरीच वाखाणण्याजोगी आहे. शिल्पा शेट्टीला लेटेस्टली मराठीकडून वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!