My Name is RaGa Movie Teaser: राहुल गांधी यांचा जीवनपट लवकरच रुपेरी पडद्यावर; 'माय नेम इज रागा' सिनेमाचा टीझर प्रदर्शित (Video)
बॉलिवूडमध्ये सध्या राजकर्त्यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर साकारणाचा ट्रेंड सुरु आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
Rahul Gandhi Biopic Teaser: बॉलिवूडमध्ये सध्या राजकर्त्यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर साकारणाचा ट्रेंड सुरु आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अलिकडेच बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील 'ठाकरे,' (Thackeray) माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचा जीवनपट 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' (The Accidental Prime Minister) हे सिनेमे प्रदर्शित झाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या बायोपिकचीही चर्चा आहे. ही चर्चा सुरु असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या जीवनावरही सिनेमा येऊ घातला आहे. 'माय नेम इज रा गा' (My Name is RaGa) असं या सिनेमाचं नाव असून सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत बायोपिकचा फर्स्ट लूक प्रदर्शित)
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येपासून ते 2019 लोकसभा निवडणूकीपूर्वीचं देशातील वातावरण इथपर्यंत सर्व काही टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. तसंच राहुल गांधींच बालपण, विद्यार्थी जीवन आणि राजकीय कारकीर्दची झलक टीझरमध्ये पाहायला मिळते.
पहा सिनेमाचा टीझर:
पत्रकार रुपेश पॉल यांनी सिनेमाची पटकथा लिहिली आहे. 'अश्विन कुमार' यानं सिनेमात राहुल गांधींची भूमिका साकारली असून मोदींची भूमिका 'हिंमत कपाडिया' यांनी साकारली आहे. एप्रिल 2019 पर्यंत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.