Pulwama terror attack: राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर T-series ने YouTube चॅनलवरुन हटवले पाकिस्तानी कलाकाराचे गाणे
राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून सर्वसामान्य नागरिकांनी आपापल्या पद्धतीने निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान, दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तान या देशावीषयी सर्व स्तरातून तिरस्कार व्यक्त होतो आहे.
Jammu and Kashmir Pulwama's Awantipora Terror Attack: जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) येथील पुलवामा (Pulwama) जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर टी-सीरीज (T-series ) या म्युझिक कंपनीने पाकिस्तानी गायकाचे (Pakistani singers) गाणे असलेला व्हिडिओ आपल्या युट्युब (YouTube) चॅनलवरुन हटवला आहे. राज ठाकरे यांच्या मनसेप्रणीत चित्रपट सेनेने इशारा दिला होता की, भारतातील खास करुन मुंबईतील म्युझिक कंपन्यांनी पाकिस्तानी गायकांसोबत काम करणे थांबवावे. या इशाऱ्यानंतर म्युझिक क्षेत्रात हालचाली सुरु झाल्या. ज्याचा परिणाम म्हणून टी-सीरीजने व्हिडिओ हटवला.
मनसे चित्रपट सेना प्रमुख अमेय खोपकर यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, 'आम्ही भारतीय संगीत कंपन्यांना जसे की, टी-सीरीज, सोनी म्यूझिक, टिप्स म्युझिक यांसारख्या कंपन्यांना पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणे बंद करावे. अन्यथा मनसे स्टाईल दणका दिला जाईल असा इशारा दिला होता.' दरम्यान, मनसेच्या इशाऱ्यानंतर भूषण कुमार यांच्या टी-सीरीज कंपनीने राहत फतेह अली खान आणि आतिफ असलम यांचे दोन वेगवेगळे व्हिडिओ हटवल्याचा दावाही खोपकर यांनी केला. मनसेच्या ईशाऱ्यानंतरच संबंधीत कंपनीने युट्युबवरुन हे गाणे हटवले असल्याचे खोपकर यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Pulwama Terror Attack: अमिताभ बच्चन यांच्याकडून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत)
दरम्यान, उरी येथे 2016 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज ठाकरे यांच्या मनसेने भारतात काम करणाऱ्या सर्व पाकिस्तानी कलाकारांना 48 तासांच्या आत देश सोडण्याची धमकी दिली होती. जम्मू काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यातील अंवतीपुरा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातनंतर देशभरात संतप्त पडसाद उमटत आहेत. राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून सर्वसामान्य नागरिकांनी आपापल्या पद्धतीने निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान, दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तान या देशावीषयी सर्व स्तरातून तिरस्कार व्यक्त होतो आहे.