Filmmaker Rajkumar Santoshi Jail: निर्माते राजकुमार संतोषी यांना दोन वर्षांचा तुंरुगवास आणि कोट्यावधींचा दंड; काय आहे नेमकं प्रकरण?
चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी गुजरात येथील जामनगर कोर्टाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Filmmaker Rajkumar Santoshi Jail: चित्रपट सृष्टीतले नामांकित निर्माते राजकुमार संतोषी सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी गुजरात येथील जामनगर कोर्टाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जामनगर कोर्टाने शनिवारी दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबत कोर्टाने त्यांना 2 कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या घटनेनंतर चित्रपट सृष्टीत खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- हैदराबाद येथील सोन्याच्या दुकानात चोरी,)
मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपट निर्माते राजकुमार संतोषी यांनी जामनगरचे व्यापारी अशोक लाल यांच्याकडून 1 कोटी रुपये उसने घेतले होते. पण नंतर ती रक्कम परत केली नाही. तर दिलेलेल चेक देखील बाऊन्स झाले होते. त्यामुळे अशोकलाल यांनी तक्रार दाखल केली आणि जामनगर न्यायालयात निर्माते राजकुमार संतोषी खटला दाखल केला होता. या प्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाने राजकुमार संतोषी यांना रोख रक्कम दंड आणि शिक्षा सुनावली आहे.
राजकुमार संतोषी यांनी बॉलिवूडमध्ये अनेक प्रसिध्द चित्रपट दिले. घायल, दामिनी आणि घातक सारखे सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली. राजकुमार संतोषी यांचे हे प्रकरम 2015 पासून सुरु झाले. २०१९ मध्ये कोर्टाने यांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. आदेशानंतर ते हजर झाले होते. यानंतर राजकुमार आणि अशोकलाल खूप चांगले मित्र आहेत असे वकिलाने म्हटले होते. 2015 रोजी अशोकलालने राजकुमार यांना एक कोटी रुपये दिले होते. या कर्जाची परतफेड करण्यासाठी संतोषी यांनी त्यांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचे 10 चेक दिले होते. मात्र डिसेंबर 2016 मध्ये बाऊन्स झाले.
चेक बाऊन्स झाल्याने अशोक यांनी सपंर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी टाळाटाळ केल्याने अशोक यांनी थेट जामनगर येथे राजकुमार यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल केला होता. कोर्टाने आता निकाल लावत संतोषी यांना दुप्पड रक्कम देण्याचे आदेश दिले आहे.