RSS ची खाकी पॅन्ट घालून आलीस का? प्रियांका चोप्रा हिची पुन्हा एकदा सोशल मीडियात ड्रेसवरुन खिल्ली

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिला काही दिवसांपूर्वी निक जोनस (Nick Jonas) सोबत बाहेर फिरताना पाहिले गेले.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस (फोटो सौजन्य-ट्वीटर)

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिला काही दिवसांपूर्वी निक जोनस (Nick Jonas) सोबत बाहेर फिरताना पाहिले गेले. त्यावेळी प्रियांका हिने देशाच्या प्रति त्याग आणि समर्पण याचा आदर दाखवणारी पवित्र संस्था स्वयंसेवक संघ RSS यांच्यासारखी दिसणारी एक खाकी रंगाची पॅन्ट घातलेली दिसून आली. मात्र या पॅन्टवरुन तिची पुन्हा एकदा सोशल मीडियात खिल्ली उडवण्यात आली आहे.

एका नेटकऱ्याने प्रियांकाच्या या लूकवरुन असे म्हटले आहे की, प्रियांकाने RSS ची खुप महत्वाची बैठक पूर्ण करुन बाहेर जात आहे. म्हणूनच खाकी पॅन्ट घातली असावी असे त्याने म्हटले आहे. परंतु प्रियांका प्रत्येक वेळी ग्लॅमरस लूकमध्ये दिसून येते. तसेच निक आणि प्रियांका यांचे फोटोसुद्धा सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरतात.(प्रियांका चोप्रा हिचा साडीत हॉट डान्स; चाहते घायाळ Watch Video)

तर प्रियांका चोप्रा हिला यापूर्वीसुद्धा मेट गाला 2019 मधील लूक वरुन ट्रोल करण्यात आले होते. त्यावेळी ही तिला विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता प्रियांका लवकरच तिचा आगामी चित्रपट 'द स्काय इज पिंक' मध्ये दिसून येणार आहे. त्यामध्ये प्रियांकासह फरहान अख्तर सुद्धा मुख्य भुमिकेत दिसणार आहे.