Anushka Sharma ने गर्भावस्थेत आपला पती विराट कोहलीच्या मदतीने केले शीर्षासन, फोटो शेअर करत अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद, See Pic

यात तिने भिंतीचा आधार घेतला असून सोबतच तिचा पती आणि उत्कृष्ट क्रिकेटर विराट कोहली तिचे पाय धरून उभा आहे

Anushka Sharma Shirshasan (Photo Credits: Instagram)

अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि संपूर्ण कुटूंब त्यांच्या घरी येणा-या चिमुकल्याच्या आगमनाच्या तयारीला लागले आहेत. अनुष्काही आपला गरोदरपणा छान एन्जॉय करताना दिसत आहे. बेबी बंप सह ती अनेक ठिकाणी मिडियाच्या कॅमे-यात दिसली आहे. आई होणार असल्याचा एक वेगळाच आनंद तिच्या चेह-यावर दिसत आहे. अशा अवस्थेत पती विराट कोहली (Virat Kohli) देखील तिची उत्तमरित्या काळजी घेताना दिसत आहे. त्यासंदर्भातील एक क्युट फोटो अनुष्काने नुकताच शेअर केला आहे. या फोटोमध्ये अनुष्का गर्भावस्थेत शीर्षासन करताना दिसत आहे. या फोटो सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या फोटोमध्ये अनुष्का डोकं खाली आणि पाय वर करुन उभी राहिली आहे. यात तिने भिंतीचा आधार घेतला असून सोबतच तिचा पती आणि उत्कृष्ट क्रिकेटर विराट कोहली तिचे पाय धरून उभा आहे.हेदेखील वाचा- Apne 2: देओल कुटुंबाच्या तीन पिढ्या पहिल्यांदाच एकत्र; 'अपने 2' मध्ये धर्मेंद्र, सनी आणि बॉबी देओल सह Karan Deol ची वर्णी

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

या फोटोखाली अनुष्काने आपल्याला या अवस्थेत शीर्षासन करता येत असल्याचा आनंद व्यक्त केला आहे. मात्र "हे शीर्षासन करण्यापूर्वी मी माझ्या डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेतला असून सोबतच माझ्या योगा शिक्षकाचीही मदत घेतली आहे. या दोघांच्या मार्गदर्शनानुसार मी ही शीर्षासन करत आहे" असे तिने या पोस्टखाली लिहिले आहे.

"माझ्या डॉक्टरांनी मला सांगितले की तू या अवस्थेत ठराविक आसन करु शकतेस असा सल्ला दिल्यानंतरच मी हे आसन केले आहे" असेही अनुष्काने सांगितले आहे.

गरोदर राहण्यापूर्वी अनुष्का जे आसन करत होती ते तिलाही आताही करता येत असल्याने ती प्रचंड खूश आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif