Apne 2: देओल कुटुंबाच्या तीन पिढ्या पहिल्यांदाच एकत्र; 'अपने 2' मध्ये धर्मेंद्र, सनी आणि बॉबी देओल सह Karan Deol ची वर्णी

धर्मेंद्र (Dharmendra) आणि देओल फॅमिली चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे. गुरु नानक जयंतीच्या शुभ मुहूर्तावर सनी देओलने (Sunny Deol) ‘अपने 2' (Apne 2) बाबत मोठी घोषणा केली आहे. या चित्रपटाद्वारे हिंदी सिनेमामधील दिग्गज धर्मेंद्र पुन्हा एकदा आपली मुले सनी आणि बॉबी देओलसह (Bobby Deol) मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत.

Apne 2: देओल कुटुंबाच्या तीन पिढ्या पहिल्यांदाच एकत्र; 'अपने 2' मध्ये धर्मेंद्र, सनी आणि बॉबी देओल सह Karan Deol ची वर्णी
Karan Deols joins Apne 2 (Photo Credits: Instagram)

धर्मेंद्र (Dharmendra) आणि देओल फॅमिली चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे. गुरु नानक जयंतीच्या शुभ मुहूर्तावर सनी देओलने (Sunny Deol) ‘अपने 2' (Apne 2) बाबत मोठी घोषणा केली आहे. या चित्रपटाद्वारे हिंदी सिनेमामधील दिग्गज धर्मेंद्र पुन्हा एकदा आपली मुले सनी आणि बॉबी देओलसह (Bobby Deol) मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. खास गोष्ट म्हणजे यावेळी देओल कुटूंबाची तिसरी पिढी म्हणजेच सनी देओल यांचा मुलगा करण देओल (Karan Deol) सुद्धा स्टारकास्टचा एक भाग असेल. धर्मेंद्र यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. या ट्वीटसोबत त्यांनी ‘अपने’ चित्रपटामधील एक क्लिप शेअर केली आहे.

सनी देओलने या चित्रपटाची घोषणा करत ट्विट केले आहे- ‘बाबाजींच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या प्रेमामुळे आम्ही आता परत एकत्र येणार आहोत. यावेळी मला माझे वडील, भाऊ आणि मुलासह काम करण्याची संधी मिळणार असल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो.’ ‘अपने 2’ पुढच्या वर्षी दिवाळीला प्रदर्शित होणार आहे.

अपने हा चित्रपट 2007 साली रिलीज झाला होता. या चित्रपटात धर्मेंद्र आणि त्यांची मुले सनी देओल आणि बॉबी देओल मुख्य भूमिकेत होते. याशिवाय शिल्पा शेट्टी, कतरिना कैफ आणि किरण खेर अभिनेत्रीही प्रमुख भूमिकेत होत्या. हा चित्रपट आणि त्याची गाणी सुपरहिट झाली होती. देओल कुटुंबाने आता अपने या कौटुंबिक चित्रपटाचा सिक्वल बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

आता पाचव्यांदा धर्मेद्र हे आपली मुले सनी आणि बॉबी यांच्यासह पडद्यावर दिसणार आहेत. याआधी धर्मेंद्र यांनी सनी आणि बॉबीसह 'यमला पगला दिवाना' फ्रँचायझीमध्ये तीन चित्रपट केले आहेत. करण देओल पहिल्यांदाच आपले आजोबा, वडील आणि काका यांच्यासमवेत स्क्रीन शेअर करणार आहे. करणने सनी देओल दिग्दर्शित 'पल-पल दिल के पास' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.

(The above story first appeared on LatestLY on Nov 30, 2020 12:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).