Baahubali 3: प्रभास आणि राजामौली पुन्हा 'बाहुबली 3'च्या तयारीत! अभिनेता म्हणाला, 'बाहुबलीचा पुढचा भाग लवकरचं येऊ शकतो'
प्रभास म्हणाला की, राजामौली बाहुबलीची फ्रेंचायझी बंद करायला तयार नाहीत. बाहुबलीचा पुढचा भाग लवकरच येऊ शकतो. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही
Baahubali 3: ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक एस. एस. राजामौली (S.S. Rajamouli) सध्या त्याच्या RRR चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत. यासोबतच बाहुबली स्टार प्रभास (Prabhas) सध्या त्याच्या 'राधे श्याम' (Radhe Shyam) चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून तो पूजा हेगडे (Pooja Hegde) सोबत स्क्रीन शेअर करणार आहे. प्रभासचा हा सिनेमा 11 मार्चला सिल्व्हर स्क्रीनवर दाखल होणार आहे. प्रभास आणि राजामौलीचं नाव घेतलं की, आपल्या डोळ्यासमोर 'बाहुबली' आणि 'बाहुबली 2' हे दोन चित्रपट दिसतात. दक्षिणेतील सर्वात आयकॉनिक आणि ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये त्याची गणना केली जाते. अशा परिस्थितीत आता चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची तयारी सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत.
एका मुलाखतीत प्रभासने सांगितले की, तो बाहुबली दिग्दर्शक एसएस राजामौलीसोबत पुन्हा हातमिळवणी करू शकतो. प्रभास म्हणाला की, राजामौली बाहुबलीची फ्रेंचायझी बंद करायला तयार नाहीत. बाहुबलीचा पुढचा भाग लवकरच येऊ शकतो. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. (वाचा - Attack Release Date: Jacqueline Fernandez आणि Rakul Preet Singh सह John Abraham 'अटॅक'साठी सज्ज; 'या' दिवशी होणार रिलीज)
दिग्दर्शक एसएस राजामौली सध्या त्यांच्या RRR चित्रपटात व्यस्त झाले आहेत, जो 25 मार्च रोजी थिएटरमध्ये दाखल होत आहे. दक्षिणेतील प्रसिद्ध चित्रपट विश्लेषक मनोबाला विजयबालन यांनीही त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबद्दल ट्विट करून चाहत्यांमध्ये खळबळ उडवली आहे.
दरम्यान, बाहुबलीमध्ये काम करत असताना, प्रभासने अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या होत्या कारण त्याला तेव्हा फक्त राजामौलीच्या प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करायचे होते. राजामौली आणि प्रभास बाहुबली 3 साठी चाहत्यांना अधिकृत माहिती येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. कारण, अद्याप निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)