Raj Kundra (Photo Credits: ANI)

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा नवरा आणि उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) हा सध्या तुरुंगाच्या बाहेर आहे. त्यानंतर त्याने पहिल्यांदाच आपले विधान जाहीर करत मौन सोडले आहे. त्याने जाहिर केलेल्या विधानानुसार असे कळते की, पोर्नोग्राफी प्रकरणावरुन मीडियात ज्या बातम्या चालवल्या गेल्या त्यामुळे तो अत्यंत विचलित झाला आहे.(अभिनेत्री ऐश्वर्या राय हिला Panama Papers Leak Case प्रकरणी ईडीने धाडले समन्स)

गेल्या काही दिवसांपूर्वीच राज आणि त्याचा परिवार संकटातून जात होता.परंतु आता पोर्नोग्राफी प्रकरणी राज याला दिलासा मिळाला आहे. जामिनावर बाहेर आलेल्या राज कुंद्राने या प्रकरणात दखल देणे आणि त्याचा प्रायव्हसीचा सम्मान करण्यासाठी अपील केले आहे.

राज कुंद्राने असे म्हटले की, खुप चिंतन केल्यानंतर मला असे वाटती काही दिशाभूल करणाऱ्या आणि बेजबाबदार विधानांसह काही लेखांमध्ये माझे मौन हे सर्वात मोठी कमजोरी असल्याचे समजले जात आहे. मी सांगू इच्छितो की, मी माझ्या आयुष्यात कधीच पोर्नोग्राफीच्या प्रोडक्शन आणि डिस्ट्रिब्युशनमध्ये सहभागी नव्हतो. हे संपूर्ण प्रकरण अजून काही नव्हे तर एक Witch Hunt आहे. हे प्रकरण विचार करायला लावणारे असल्याने मी स्पष्ट करु शकत नाही. परंतु मी खटल्याचा सामना करण्यास तयार असून न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. दुर्भाग्याने मला मीडिया आणि माझ्या परिवाराद्वारे आधीच दोषीत करण्यात आले होते. मला विविध स्तरावर आपल्या मानवीय आणि संवैधानिक अधिकारांचे उल्लंघन करत सातत्याने खुप दु:खाचा सामना करावा लागला आहे.

ट्रोलिंग/नकारात्मकता आणि लोकंची घृणा वाढत चालली आहे. मी लज्जेने माझा चेहरा लपवत नाही आहे. परंतु असे वाटते की, या निरंतर मीडिया ट्रायलसोबत माझ्या गोपनियतेत कोणीही दखल देऊ नये. माझी प्राथिमकता नेहमीच माझा परिवार होता. या क्षणी इतर काहीही महत्त्वाचे नाही, माझा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि मी तशी विनंती करतो. हे विधान वाचण्यासाठी वेळ दिल्याबद्दल आणि आतापासून माझ्या गोपनीयतेचा आदर केल्याबद्दल धन्यवाद.'