PM Narendra Modi Biopic Song: नरेंद्र मोदी यांचा संघर्षमय प्रवास दाखवणारे 'फकिरा' गाणे प्रदर्शित (Video)
त्यापूर्वी सिनेमातील नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचा जीवनप्रवास उलघडणारा सिनेमा 'पीएम नरेंद्र मोदी' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. त्यापूर्वी सिनेमातील नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'फकिरा' (Fakeera) असे हे गाणे असून यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनातील संघर्ष चित्रित केला आहे. पहा सिनेमाचा ट्रेलर
राजा हसन आणि शशी सुमन यांच्या आवाजातील हे गाणे शशी-खुशी यांनी संगीतबद्ध केले आहे. तर सदारा यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. सिनेमाचे दिग्दर्शक उमंग कुमार यांनी हे गाणे ट्विटरवर शेअर केले. (PM Narendra Modi Biopic पोस्टरवर 'गीतलेखक' म्हणून उल्लेख पाहून जावेद अख्तर आश्चर्यचकीत; ट्रोलर्सनीही दिला अख्तरांना सल्ला)
उमंग कुमार यांचे ट्विट:
पहा व्हिडिओ:
पीएम नरेंद्र मोदी यांचा बायोपिक असलेला हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. मात्र आता या सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या सिनेमात 'विवेक ओबेरॉय' मोदींची भूमिका साकारत असून 5 एप्रिलला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.