Phone Bhoot Trailer Out: 'फोन भूत'चा ट्रेलर रिलीज; कतरिना-सिद्धांत आणि ईशानची कॉमेडी पाहून व्हाल लोटपोट, Watch Video
या चित्रपटात कतरिना पहिल्यांदाच सर्वात सुंदर भूत म्हणून दिसणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण केली आहे. तर सिद्धांत चतुर्वेदी आणि इशानने या चित्रपटात भूत पकडणाऱ्या शिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.
Phone Bhoot Movie Trailer: बहुप्रतिक्षित 'फोन भूत' या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा एक कॉमेडी हॉरर चित्रपट आहे. 'फोन भूत'मध्ये कतरिना कैफ (Katrina Kaif), सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) आणि इशान खट्टर (Ishaan Khattar) दिसणार आहेत. हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा विषय होता. यामध्ये कतरिना पहिल्यांदाच सर्वात सुंदर भूत म्हणून दिसणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण केली आहे. तर सिद्धांत चतुर्वेदी आणि इशानने या चित्रपटात भूत पकडणाऱ्या शिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. ईशान आणि सिद्धांत सर्वात सुंदर भूत, कतरिना कैफला भेटतात आणि त्यानंतर त्यांचा मजेदार आणि भयानक प्रवास सुरू होतो. फोन भूत हा आणखी एक कॉमेडी हॉरर चित्रपट आहे, जो या वर्षीच्या ब्लॉकबस्टर 'भूल भुलैया 2' नंतर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
खरंतर 'फोन भूत' ही हॉरर कॉमेडी नसून ती कॉमेडी ऑफ हॉरर आहे. हा चित्रपट पॉप संस्कृती आणि चित्रपट परिस्थितींसह जाणाऱ्या वेड्या मजेदार साहसांनी भरलेला आहे. या चित्रपटाची कथा चांगला विरुद्ध वाईट अशी आहे. गुरमीत सिंग दिग्दर्शित आणि रविशंकरन आणि जसविंदर सिंग बाथ लिखित, फोन भूत एक्सेल एंटरटेनमेंट द्वारे निर्मित आहे. ज्याचे प्रमुख रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर आहेत. हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी रिलीज होणार आहे. (हेही वाचा - Nora Fatehi Performance At FIFA: अभिनेत्री नोरा फतेही लगवणार फुटबॉल फिफा वर्ल्डकपमध्ये ठुमके, फिफामध्ये परफॉर्म करणारी नोरा पहिली भारतीय अभिनेत्री)
काही काळापूर्वी 'फोन भूत'चे मोशन पोस्टर रिलीज झाले होते. या मोशन पोस्टरमध्ये चित्रपटाची स्टार कास्ट दिसली, जी चित्रपटाच्या इनसाइट वर्ल्डची झलक होती. बातमी लिहिपर्यंत 'फोन भूत' चित्रपटाच्या ट्रेलरला 949,154 व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचवेळी 72 हजार लाईक्स आणि सुमारे 4 हजार कमेंट्स आल्या आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)