Paurashpur: ‘पौरषपूर’ वेबसीरीज बोल्ड सिनमुळे चर्चेत; ऑल्ट बालाजी आणि जी5 वर 29 डिसेंबरला होणार प्रदर्शित
नुकताच ‘पौरषपूर’ या वेब सीरीजचा ट्रेलर लाँच झाला आहे. पौरषपूर ही वेबसीरीज पुरुषी मक्तेदारीविरोधात, महिलांना मिळणारी असमान वागणूक यावर आधारित आहे. या सीरिजचे 7-8 भाग असणार आहेत.
नुकताच ‘पौरषपूर’ या वेब सीरीजचा ट्रेलर लाँच झाला आहे. पौरषपूर ही वेबसीरीज पुरुषी मक्तेदारीविरोधात, महिलांना मिळणारी असमान वागणूक यावर आधारित आहे. या सीरिजचे 7-8 भाग असणार आहेत. ही वेबसीरीज येत्या 29 डिसेंबरला ऑल्ट बालाजी आणि जी5 प्रदर्शित होणार. मात्र, प्रदर्शित होण्याआधीच ही वेबसीरीज चर्चेत आली आहे. पौरषपूर या वेबसीरीजमध्ये दाखवण्यात आलेल्या बोल्ड सिनची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या वेबसिरीज मधील सर्वच कलाकार वेगळ्या भूमिकेत आणि वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. अभिनेता मिलिंद सोमण याचा या वेबसीरीजमध्ये अनोखा लूक पाहायला मिळत आहे.
या वेबसीरीज मिलिंद सोमण, अन्नू कपूर, शिल्पा शिंदे, शाहीर शेख, पौलमी दास, साहिल सलाथिया आणि फ्लोरा सैनी एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. पौरषपूरसारख्या वेब सीरीजमध्ये काम करत असताना भारी वाटत आहे. आशा आहे की, शूटच्या वेळी आम्ही जितका आनंद घेतला तितका तुम्हीपण पाहताना घ्याल, असे शिप्ला शिंदे म्हणाली आहे. हे देखील वाचा- Exclusive! OTT प्लेटफॉर्म ला काम करणे खूप चॅलेंजिंग, आर्टिस्ट नितीन चंद्रकांत देसाई यांनी सांगितल्या 'Paurashpur' वेबसीरिजचा सेट घडविण्याचा अनुभव
युट्यूब व्हिडिओ-
या वेबसिरीज मधील मिलिंद सोमणच्या लूकला अधिक पसंती दिर्शवली जात आहे. मिलिंद सोमणने या वेबसीरीजमध्ये बोरीस नावाचे पात्र साकारले आहे. बोरीस हे पात्र तृतीयपंथी असल्याचे दाखवण्यात आले आहे.‘पौरषपूर’ या वेबसीरिजसाठी मिलिंद सोमणने नाकात नथ, धोतर, कपाळाला कुंकू, लांब केस, हातात तलावर असा किलिंग लूक परिधान केला आहे. त्याच्या या लूकवर त्याचे चाहते फिदा झाले आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Dec 08, 2020 08:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

