Pathan Worldwide Box Office: अबब! तीन दिवसात 300 कोटी! विकेडाला शाहरुखचा 'पठाण' रचणार नवा विक्रम

किंग खानच्या पठाणसाठी सिनेमागृहात मोठी गर्दी बघायला मिळत असुन फक्त तीन दिवसात पठाणने जवळपास ३०० कोटींचा गल्ला जमवला आहे.

Pathaan Poster (PC - Facebook)

तब्बल चार वर्षानंतर बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाकेदार एण्ट्री मारली आहे. शाहरुखचा चर्चित, कॉन्ट्रोव्हर्सल आणि मोस्ट अवेटेड सिनेमा पठाण प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. तरी  किंग खानच्या पठाणसाठी सिनेमागृहात मोठी गर्दी बघायला मिळत असुन फक्त तीन दिवसात पठाणने जवळपास ३०० कोटींचा गल्ला जमवला आहे. एवढचं नाही तर बाहूबली २ या सिनेमानंतर शाहरुखचा पठाण हा सर्वाधिक अडव्हान्स बुकींग झालेला सिनेमा ठरला असुन बॉलिवूडने यांत आपल्या नावी नवा विक्रम नोंदवला आहे. तरी पठाणची पहिल्या तीन दिवसातली कमाई बघता चित्रपट सुपरहिट ठरला अस म्हणता येईल. एवढचं नाही तर पठाणने थेट हॉलिवूड सिनेमा अवतारचा देखील रेकॉर्ड मोडला आहे.  शाहरुखच्या चाहत्यांचा भरगोस मिळणार प्रतिसाद-उत्साह बघता पठाण हा बॉलिवूड मधील ब्लॉकबास्टर सिनेमा ठरेल यांत काहीही शंका नाही. पहिल्या तिन दिवसातला जनतेचा जोरदार प्रतिसाद बघता या विकेंडाला पठाण सगळ्या बॉलिवूड सिनेमांचे रेकॉर्ड तोडेल अशी शक्यता आहे.

 

भारतात पठाणने पहिल्या दिवशी 55 कोटी, दुसऱ्या दिवशी  68 कोटी तर तिसऱ्या दिवशी  35 कोटींचा गल्ला केला आहे.म्हणजेच भारतातील  एकूण कमाईचा आकडा 158 कोटींवर पोचला आहे. तर आंतरराष्ट्रीय कमाई बघता तीन दिवसात एकूण गल्ला ३०० कोटींचा झाला आहे. पण आता शाहरुखचा पठाण सिनेमांचा रेकॉर्ड मोडणार की या सिनेमाच्या रांगेत आपले स्थान मिळवणार याकडे बॉलिवूड विश्वाचं लक्ष लागलं आहे. (हे ही वाचा:- Ranbir Kapoor Video: ..आणि रणबीर कपूरने थेट चाहत्याचा मोबाईल फेकून दिला, सोशल मिडीयावर Angry रणबीरची जोरदार चर्चा)

 

तरी पठाण हा सिनेमा यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा एक भाग असुन याचा संबंध ऋतिक रोषनच्या वॉर सिनेमाशी जोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तरी पठाणमध्ये बॉलिवूडचा भाईजान झळकल्याने प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह बघाय़ला मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाचे विविध शो हाऊसफूल जात आहे. तरी पठाणची चर्चा फक्त भारतातचं नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आहे. कारण विविध देशा किंग खानची मोठी फॅन फॉलोविंग आहे.