Parineeti Chopra-Raghav Chadha Engagement: येत्या 13 मे रोजी होणार परिणीती चोप्रा व राघव चढ्ढा यांचा साखरपुडा; दिल्लीत पार पडणार सोहळा- Reports

राघव चढ्ढा हे संसदेचे सर्वात तरुण सदस्य आहेत. दुसरीकडे, परिणीती चोप्राने अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. परिणीती याआधी दिग्दर्शक मनीष शर्माला डेट करत असल्याचे म्हटले गेले होते.

Parineeti Chopra-Raghav Chadha Engagement: येत्या 13 मे रोजी होणार परिणीती चोप्रा व राघव चढ्ढा यांचा साखरपुडा; दिल्लीत पार पडणार सोहळा- Reports
Parineeti Chopra, Raghav Chadha (संग्रहित संपादित प्रतिमा)

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. बऱ्याच दिवसांपासून अभिनेत्रीच्या लग्नाच्या बातम्या समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी परिणीती चोप्रा आणि आप पक्षाचे नेते राघव चढ्ढा (Raghav Chadha) एकत्र लंच आणि डिनर करताना दिसले होते. दोघेही 22 मार्च रोजी डिनर डेटवर बाहेर गेले होते आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी लंच डेटसाठी पुन्हा भेटले. तेव्हापासून त्यांच्या अफेअरच्या आणि लग्नाच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र, आतापर्यंत या दोघांनीही याबाबत मौन सोडलेले नाही.

परिणीती आणि राघव मार्चमध्ये दोनदा एका रेस्टॉरंटमधून बाहेर फिरताना दिसले होते आणि तेव्हापासून त्यांच्या लग्नाबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. आता या लग्नाबाबत एक मोठे अपडेट समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सचा दावा आहे की दोघेही लवकरच साखरपुडा करणार आहेत. अहवालानुसार राघव आणि परिणीती येत्या 13 मे रोजी दिल्लीमध्ये एंगेजमेंट करणार आहेत.

यापूर्वी अशी बातमी आली होती की परिणीती आणि राघवची रोका सेरेमनी पार पडला असून ते यावर्षी ऑक्टोबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, प्रियांका चोप्रा ऑक्टोबरमध्ये लग्नाला उपस्थित राहू शकते, कारण ती त्याच वेळी जिओ मामी (Jio MAMI) फिल्म फेस्टिव्हलसाठी भारतात येणार आहे. (हेही वाचा: Salman Khan On Relationship: 'माझ्या प्रेमकथा माझ्यासोबत कबरीत जातील' - सलमान खान)

दरम्यान राघव चढ्ढा हे संसदेचे सर्वात तरुण सदस्य आहेत. दुसरीकडे, परिणीती चोप्राने अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. परिणीती याआधी दिग्दर्शक मनीष शर्माला डेट करत असल्याचे म्हटले गेले होते. त्यांना वेगळे होऊन जेमतेम एक वर्ष झाले आहे. आता हे पाहायचे आहे की परिणीती आणि राघव यांच्यातील या भेटी केवळ अनौपचारिक भेटी होत्या की नवीन नात्याची सुरुवात होती.

(The above story first appeared on LatestLY on May 02, 2023 06:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).