Parag Tyagi Immerses Ashes Shefali Jariwala: मुंबईत पराग त्यागीने केले पत्नी शेफाली जरीवालाच्या अस्थीचे विसर्जन, पहा व्हिडिओ

शुक्रवारी शेफालीच्या कुटुंबाने तिचे अंतिम संस्कार केले. तथापी, आज शेफालीच्या अस्थींचे समुद्रात विसर्जन करण्यात आले. अंत्यसंस्कारादरम्यान शेफालीचा पती पराग (Parag Tyagi) आणि तिच्या पालकांचे दुःख अनावर झाले होते.

Parag Tyagi Immerses Ashes Shefali Jariwala: मुंबईत पराग त्यागीने केले पत्नी शेफाली जरीवालाच्या अस्थीचे विसर्जन, पहा व्हिडिओ
Parag Tyagi Immerses Ashes Shefali Jariwala | Instagram

Parag Tyagi Immerses Ashes Shefali Jariwala: प्रसिद्ध टीव्ही आणि संगीत क्षेत्रातील अभिनेत्री शेफाली जरीवाला (Shefali Jariwala) च्या अचानक निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी अभिनेत्रीने शेवटचा श्वास घेतला. शुक्रवारी शेफालीच्या कुटुंबाने तिचे अंतिम संस्कार केले. तथापी, आज शेफालीच्या अस्थींचे समुद्रात विसर्जन करण्यात आले. अंत्यसंस्कारादरम्यान शेफालीचा पती पराग (Parag Tyagi) आणि तिच्या पालकांचे दुःख अनावर झाले होते. पत्नीला कफनमध्ये पाहून पराग स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही.

परागने शेफालीच्या अस्थी समुद्रात विसर्जित केल्या. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, परागने आपल्या हातात कलश धरला होता. यावेळी त्याला अश्रू अनावर झाले. त्याने संपूर्ण कुटुंबासह आपल्या पत्नीची अस्थी समुद्रात विसर्जित केली. या दरम्यान परागचे दुःख सर्वांनाच आतून जाणवले. या दुःखद प्रसंगी, शेफालीची आई देखील मुलगी गमावल्याच्या दुःखाने तुटून गेली. (हेही वाचा - Shefali Jariwala Death: 15 वर्षांपासून शेफाली जरीवाला 'या' आजाराशी झुंजत देत होती; मुलाखतीत केला 'होता' खुलासा)

शेफालीच्या अस्थीचे समुद्रात विसर्जन

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

शेफाली जरीवालाने तिच्या अभिनयाने कोट्यवधी लोकांची मने जिंकली होती. तिच्या अचानक झालेल्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावरील लोक तिच्या कुटुंबासाठी सतत प्रार्थना करत आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Jun 29, 2025 05:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).