पानिपत सिनेमाचा ट्रेलर पाहून राज ठाकरे यांची आश्चर्यकारक प्रतिक्रिया, पहा ट्विट

राज यांनी केलेल्या ट्विट मधून त्यांनी सिनेमाचे कौतुक करत प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावत आहेत.

Raj Thackrey Reactions Panipat Trailer (Photo Credits: Facebook)

ऐतिहासिक चित्रपट दिग्दर्शनातील मोठं नाव आशुतोष गोवारीकर (Ashutosh Govarikar)  यांचा नवा कोरा सिनेमा ‘पानिपत – द ग्रेट बेट्रेयल’ (Panipat- The Great Betrayal) येत्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच सोशल मीडियावरून या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलर मधून संजय दत्त (Sanjay Dutt), क्रिती सनॉन (Kriti Sanon) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) यांचे ऐतिहसिक अंदाज पाहायला मिळाले.  या ट्रेलरवरून येणाऱ्या संमिश्र प्रतिक्रियांमध्ये नेटकऱ्यांनी अर्जुन कपूरने साकारलेली सदाशिवरावांची भूमिका इथपासून ते सिनेमाच्या ट्रेलरवरून कथानकाचा येणार अंदाज या साऱ्यावर आक्षेप घेतले होते.  तर दुसरीकडे ,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांनी मात्र आश्चर्यकारक टिपण्णी केली आहे. राज यांनी केलेल्या ट्विट मधून त्यांनी सिनेमाचे कौतुक करत प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावत आहेत.

राज ठाकरे यांच्या ट्विट मध्ये “दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा मराठा साम्राज्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या लढाईवरचा ‘पानिपत’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच पाहिला. ट्रेलरच इतका सुंदर आहे की चित्रपटाची लढाई आशुतोष जिंकणार याची खात्री आहे.” असे म्हणत या ट्रेलरसोबतच चित्रपटदेखील पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Panipat च्या ट्रेलर मुळे सुरु झालाय नवा वाद; 'अब्दाली'च्या भूमिकेवरून अफगाणिस्तान झालंय चिंताग्रस्त

राज ठाकरे ट्विट

दरम्यान, अटकेपार झेंडा गाडणाऱ्या पानिपतचा युद्धाची महती मांडणारा हा चित्रपट असणार आहे. कथानकावर होणारी आक्षेप बाजूला सरल्याससिनेमामधून भव्य दिव्य असे रूप साकारले जाणार आहे हे निश्चित. या चित्रपटात अफगाणिस्तानचा शासक अहमद शहा अब्दालीच्या भूमिकेत संजय दत्त व पार्वतीबाईंच्या रूपात क्रिती सनॉन दिसणार आहेत. हा बहुचर्चित सिनेमा 6 डिसेंबर रोजी प्रदर्शित होईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif