TMKOC Controversy: कायदेशीर वादानंतर Palak Sindhwani 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतून बाहेर; साकारायची Sonu Bhide नामक व्यक्तिरेखा

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (TMKOC) मालिकेत 'सोनू भिडे' ची भूमिका करणारी पलक सिंधवानी कायदेशीर वाद आणि मानसिक छळाच्या आरोपांदरम्यान शोमधून बाहेर पडत आहे.

Palak Sindhwani | Photo Credit - instagram)

'सोनू भिडे' (Sonu Bhide) व्यक्तिरेखा साकारत घराघरात पोहोचलेल्या पलक सिंधवानी (Palak Sindhwani) हिने 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका सोडत असल्याची घोषणा केली आहे. नीला फिल्म प्रॉडक्शनने तिच्यावर तिच्या कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप करत तिला नुकतीच एक कायदेशीर नोटीस पाटवली होती. या पार्श्वभूमीवर ही अभिनेत्रीकडून ही मोठी घोषणा करण्यात आली आहे. अलिकडी काही काळात अभिनेत्री आणि प्रॉडक्शन हाऊस यांच्यात तीव्र मतभेद सुरु असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून झळकले होते. हा संघर्ष आता कायदेशीर वळणावरही पोहोचल्याचे सांगितले जात आहे.

मानसिक छळ आणि शोषणाचा आरोप

पलक सिधवानी हिने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले की, 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेसाठी काम करत असताना तिला मानसिक छळ आणि शोषणाचा सामना करावा लागला. दरम्यान, प्रोडक्शन हाऊसचा दावा आहे की, सिधवानी हिने कथितपणे निर्मिती संस्थेकडून कोणतीही पूर्वपरवानगी न घेता तृतीय-पक्षाच्या जाहिरातींमध्ये भाग घेतला. त्या जाहीरातिच्या चित्रिकरणासही ती हजर राहिली. परिणामी तिला संस्थेकडून कायदेशीर नोटीस जारी करण्यात आली होती. ज्यामध्ये तिच्याकडून झालेल्या विशिष्ट कराराच्या उल्लंघनाचा उल्लेख होता.

कायदेशीर सूचना आणि आरोप

वृत्तसंस्था आयएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्री आणि प्रॉडक्शन हाऊस यांच्यातील वाद टोकाला गेला होता. अभिनेत्रीने कथीतपणे त्रयस्त संस्थेसोबत जाहिरातीसाठी चित्रिकरण केले होते. ज्यामुळे तिच्याकडून संस्थेसोबत असलेल्या विशेष कराराचे उल्लंघन झाले होते. निर्मात्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, तिच्या कृतीमुळे तिची व्यक्तिरेखा आणि मालिका या दोन्हींच्या अखंडतेशी तडजोड झाली. अनेकदा सूचना देऊनही तिच्याकडून उल्लंघन सुरूच राहिले, ज्यामुळे निर्मिती संस्थेला अंतिम पाऊल म्हणून कायदेशीर नोटीस जारी करण्यास प्रवृत्त केले गेले.

सिंधवानीने कायदेशीर कारवाईला प्रतिसाद देत ती लवकरच शोमधून बाहेर पडणार असल्याची पुष्टी केली. तिच्या जाण्याने दीर्घकाळ चाललेल्या मालिकेतील हाय-प्रोफाइल एक्झिटची जोरदार चर्चा आहे. शिवाय तिच्या जागी कोणता कलाकार काम याबाबतही उत्सुकता आहे.

TMLOC या आधीही वादात

'तारक मेहता का उल्टा चष्मा'ला वादाचा सामना करावा लागण्याची ही पहिली वेळ नाही. या वर्षाच्या सुरुवातीला, 'रोशन सोडी' ची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बन्सीवालने निर्माता असित मोदी आणि कार्यक्रमाच्या इतर सदस्यांवर अनुचित वागणूक आणि छळ केल्याचा आरोप केला. नुकसान भरपाई म्हणून 5 लाख रुपये मिळवून आणि तिची थकबाकी वसूल करून तिने अखेरीस खटला जिंकला.

पलक सिंधवानी

 

View this post on Instagram

 

A post shared by Palak Sindhwani (@palaksindhwani)

आणखी एका वादात, 'तारक मेहता' ची भूमिका साकारणारा अभिनेता शैलेश लोढा याने त्याचे पैसे रोखल्याबद्दल कार्यक्रमाच्या निर्मात्यांविरोधात खटला दाखल केला गेला. पाठिमागच्याच वर्षी म्हणजेच 2023 मध्ये लोढाने हा खटला जिंकला आणि निर्मात्यांना प्रलंबित रक्कम भरण्याचे आदेश देण्यात आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Palak Sindhwani (@palaksindhwani)

हा कार्यक्रम जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे अलीकडील वादांमुळे त्याच्या दीर्घकालीन प्रतिष्ठेवर पडदा पडला आहे. सिंधवानीच्या बाहेर पडल्यानंतर हा कार्यक्रम कसा पुढे जाईल हे पाहण्यासाठी चाहते आता वाट पाहत आहेत.