पाकिस्तानी न्यूज चॅनलची मोठी चूक; हत्या प्रकरणात आरोपी MQM लीडर ऐवजी दाखवला बॉलिवूड अभिनेता आमिर खान याचा फोटो (See Viral Post)
हे वृत्त दाखवताना एमक्यूएम लीटर आमिर खान ऐवजी बॉलिवूड अभिनेता आमिर खान याचा फोटो वापरण्यात आला.
ब्रेकिंग न्यूजच्या जमान्यात सर्वात आधी कोण बातमी सादर करणार ही स्पर्धा असते. त्यामुळे अनेकदा घाईत न्यूज चॅनेल्स आणि मीडिया पब्लिकेशन्स कडून अशा चुका होतात की ज्यामुळे त्यांच्यावर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ येते. तर अनेकदा ते हास्यास पात्र ठरतात. अलिकडेच पाकिस्तानी न्यूज चॅनेल ने देखील अशीच चूक केली. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची चांगलीच खिल्ली उडवण्यात येत आहे. पाकिस्तानी एमक्यूएम (MQM) लीडर अमिर खान (Amir Khan) यांची डबल मर्डर केस मधून मुक्तता करण्यात आली होती. हे वृत्त दाखवताना एमक्यूएम लीटर अमिर खान ऐवजी बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) याचा फोटो वापरण्यात आला.
एका पत्रकाराने या न्यूज चॅनलचा स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर करत चांगलाच समाचार घेतला आहे. स्क्रिनशॉट मध्ये बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा फोटो स्पष्टपणे दिसत आहे.
पहा व्हायरल पोस्ट:
काही वेळातच हा फोटो ट्विटरवर व्हायरल झाला आणि न्यूज चॅनलची चांगलीच खिल्ली उडवण्यात आली. त्यावर प्रतिक्रीयांचा भडिमार सुरु झाला. एका युजरने म्हटले की, "यात अभिनेता आमिर खान याला टॅग करा. तो ही अचंबित होईल."
लॉकडाऊनमुळे सध्या सिनेमा, मालिकांचे शूटिंग पूर्णपणे रद्द आहे. मात्र त्यानंतर लवकरच आमिर खान 'लाल सिंह चड्ढा' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्यात आमिर खान सह करीना कपूर झळकणार आहे.