Virat Kohli and Anushka Sharma: लग्नाच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबतचा रोमँटिक फोटो शेअर करत लिहिला 'हा' खास संदेश
कोहलीने 11 डिसेंबर 2017 मध्ये अनुष्कासोबत इटलीत लग्न केलं. त्यांचा विवाह सोहळा पूर्णपणे कौटुंबिक होता आणि त्यात फार कमी लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. आता कोहलीने पत्नीला एक सुंदर संदेश लिहिला आहे.
Virat Kohli and Anushka Sharma: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli ) च्या लग्नाला 5 वर्षे झाली आहेत. लग्नाच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त त्याने पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना एक खास संदेश लिहिला आहे. कोहलीने 11 डिसेंबर 2017 मध्ये अनुष्कासोबत इटलीत लग्न केलं. त्यांचा विवाह सोहळा पूर्णपणे कौटुंबिक होता आणि त्यात फार कमी लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. आता कोहलीने पत्नीला एक सुंदर संदेश लिहिला आहे.
कोहलीने लिहिले, "अनंत प्रवासाची पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. तुला मिळवून मी धन्य आहे." कोहली आणि अनुष्का खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते आणि सुरुवातीला त्यांनी त्यांचे नाते फार काळ सार्वजनिकही केले नव्हते. मात्र, हळूहळू दोघांनीही हे नातं स्वीकारण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या नात्याचा जाहीरपणे स्वीकार केला. यानंतर कोहलीने अचानक लग्नाचा बेत आखला आणि दोघांनीही इटलीला जाऊन एका छोट्याशा समारंभात लग्न केले. लग्न आटोपल्यानंतर भारतात परतल्यानंतर दोघांनी दिल्ली आणि मुंबईत मोठ्या पार्टीचे आयोजन केले होते आणि त्यात आपल्या सर्व प्रियजनांना आमंत्रित केले होते. (हेही वाचा - Sara Ali Khan Travel by Mumbai Local: मुंबईच्या ट्राफिकपासून वाचण्यासाठी अभिनेत्री सारा अली खानने केला लोकल व रिक्षाने प्रवास (Watch Viral Video))
View this post on Instagram
बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने शानदार शतक झळकावले. कोहलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 72 शतके आहेत आणि आता तो सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांसह दुसरा फलंदाज बनला आहे. फक्त सचिन तेंडुलकरने कोहलीपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. कोहलीने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत आतापर्यंत 44 शतके झळकावली आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Dec 11, 2022 07:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

