Manikarnika: The Queen of Jhansi सिनेमातील 'झलकारी बाई'च्या भूमिकेतील Ankita Lokhandeचा पहिला फोटो
अनेकदा झलकारी बाई या राणी लक्ष्मीबाईच्या ( Rani Laxmibai) वेशात युद्धभूमीवर जात असत. त्यामुळे भूमिकेतील करारीपणा अंकिताच्या चेहर्यावरही दिसत आहे.
Ankita Lokhande as Jhalkari Bai : 'मणिकर्णिका' (Manikarnika: The Queen of Jhansi ) या आगामी सिनेमातून हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नुकताच अंकिताच्या सिनेमातील लूकचा पहिला फोटो शेअर करण्यात आला आहे. अंकिता या सिनेमात 'झलकारी बाई'(Jhalkari Bai )ची भूमिका साकारत आहे. झलकारी बाई या राणी लक्ष्मीबाईच्या सल्लागार, महिला सेनेच्या सेनापती होत्या. अनेकदा झलकारी बाई या राणी लक्ष्मीबाईच्या ( Rani Laxmibai) वेशात युद्धभूमीवर जात असत. त्यामुळे भूमिकेतील करारीपणा अंकिताच्या चेहर्यावरही दिसत आहे.
'मणिकर्णिका' सिनेमामध्ये राणी लक्ष्मीबाईंच्या प्रमुख भूमिकेमध्ये अभिनेत्री कंगणा रणावत दिसणार आहे. यासोबतच अतुल कुलकर्णी 'तात्या टोपे', सुरेश ऑबेरॉय 'बाजीराव', डॅनी डॅन्झोप्पा 'नाना साहेब', जिशू सेनगुप्ता 'गंगाधरराव' यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार मणिकर्णिका या सिनेमाचा ट्रेलर 18 डिसेंबरला रसिकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. मात्र अजूनही याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तसेच लवकरच या सिनेमाच्या रीलिज डेटबाबतचादेखील खुलासा करण्यात येणार आहे.