Neha Kakkar साठी ऑक्टोबर महिना ठरला Lucky! लग्नापूर्वी चाहत्यांना दिली होती आणखी एक आनंदाची बातमी ज्याने तोडले आहेत सर्व रेकॉर्ड, Watch Video
लग्नाच्या काही दिवस आधी ऑक्टोबर महिन्यातच नेहा ने आपल्या चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली होती. नेहा ने आपला भाऊ टोनी कक्कड़सोबत (Tonny Kakkar) 7 ऑक्टोबरला एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. ज्या व्हिडिओमध्ये तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती.
बॉलिवूडची क्यूट, गोड गळ्याची आणि अवघ्या तरुणाईला आपल्या तालावर नाचवणारी गायिका नेहा कक्कड़ (Neha Kakkar) ही नुकतीच रोहनप्रीत सिंह (Rohanpreet Singh) याच्याोबत विवाहबद्ध झाली आहे. तिच्या लग्नाचे व्हिडिओज, फोटोज सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले. त्यानंतर सासरी झालेले तिचे जंगी स्वागत हा व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाला. आपल्या जादुई आवाजाने सर्वांना वेडं लावणारी नेहा हिच्या लग्नाला घेऊन तिचे चाहते फार उत्सुक होते. तिच्या लग्नाबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या अफवा ऐकायला मिळत होत्या. त्यात अचानक तिची लग्न पत्रिका व्हायरल झाल्यानंतर या चर्चांना आणखी उधाण आले. मात्र तुम्हाला माहित आहे की Neही बातमी म्हणजे तिचे गाणे 'मिले हो तुम हमको' (Mile Ho Tum Humko) या गाण्याला युट्यूबवर 1 बिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले. तिने आपल्या भावासोबत ही बातमी देऊन आपल्या भावाचे कौतुक केले होते. Neha Kakkar-Rohanpreet Singh Wedding: नेहा कक्कड़ चे सासरी झाले ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत, पाहा धमाल Videos
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे युट्यूबवरील हे पहिले भारतीय गाणे ठरले आहे ज्याला 1 बिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सोबतच हा पहिला असा भारतीय व्हिडिओ ठरला आहे ज्याला इतके व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याच्या व्हिडिओ हे आणि यांसारखे अनेक रेकॉर्ड्स तोडले आहेत. त्यामुळे ही गोड बातमी या भावा-बहिणींनी सोशल मिडियावर शेअर केली.
टोनी कक्कड़ ने स्वत: हे गाणे लिहिले असून याचा संगीतकार आणि गायक देखील तोच आहे. या गाण्यात त्याची बहिण नेहा कक्कड हिने त्याला साथ दिली आहे. नेहा ने या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे हा व्हिडिओ बनविण्यासाठी केवळ 11,000 रुपये इतका खर्च आला होता. असे असताना देखील केवळ शब्द आणि आवाजाच्या जोरावर हे गाणे सुपरहिट ठरले. थोडक्यात ऑक्टोबर महिना हा नेहाच्या आयुष्यात खूप सारा आनंद, खूप सारे सुखद धक्के देणारा होता असच म्हणावं लागेल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)