'नोरा फतेही'चा मल्याळम गाण्यातील बोल्ड डान्स पाहून व्हाल दंग! (Video)

बॉलिवूड सिनेमांनंतर आता नोरा मल्याळम सिनेमातही आपल्या नृत्याचा जलवा दाखवत आहे. सुपरहिट मल्याळम सिनेमातील डान्स व्हिडिओ तिने इंस्टावर शेअर केला आहे.

Nora Fatehi (Photo Credits: Youtube)

आपल्या नृत्याने प्रेक्षकांचे मनं जिंकणारी अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) हीची अनेक गाणी हिट झाली आहेत. 'सत्यमेव जयते' (Satyamev Jayate) मधील 'दिलबर दिलबर' (Dilbar Dilbar) गाणे असो किंवा 'स्त्री' (Stree) सिनेमातील 'कमरिया' (Kamariya) हे आयटम सॉन्ग. ही गाणे सुपरहीट तर ठरलीच पण या गाण्यांनी अनेकांना ठेका धरायला भाग पाडले. बॉलिवूड सिनेमांनंतर आता नोरा मल्याळम सिनेमातही आपल्या नृत्याचा जलवा दाखवत आहे. सुपरहीट मल्याळम सिनेमातील डान्स व्हिडिओ तिने इंस्टावर शेअर केला आहे.

"साऊथच्या सुपरहिट सिनेमातील माझे सर्वात पहिले हिट मल्याळम सॉन्ग. अजून एका हिट सिनेमाचा भाग झाल्याने मी खूप खूश आहे," असे लिहित तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

Swipe left My first ever hit Malayalam song from the Blockbuster super hit south movie “Kayamkulam kochunni” with Nivin Pauly ! Happy to be apart of another massive successful movie in 2018! Full Video in my IGTV watch it there Hair and makeup @marcepedrozo #norafatehi

A post shared by Nora Fatehi (@norafatehi) on

लवकरच नोरा फतेही अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सिनेमात सलमान खान, कॅटरिना कैफ आणि दिशा पटानी यांसारखे कलाकाल प्रमुख भूमिकेत आहेत. याशिवाय जॉन अब्राहमच्या 'बाटला हाऊस' सिनेमातही नोरा झळकेल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now