New Year 2019 : बॉलिवूड ते मराठमोळ्या कलाकारांनी परदेशात 'असं' केलं नववर्षाचं स्वागत! (Photos)
तैमूर अली खानपासून प्रियंका निक, विराट - अनुष्का यांनी जगभरात पहा कुठे केलं नववर्षाचं स्वागत
New Year Celebration: 2019 ची सुरुवात झाली आहे. नवं वर्ष सेलिब्रेशनचा (New year Celebration) प्रत्येकाचा प्लॅन वेगवेगळा होता. काहींनी देवदर्शन घेऊन नव्या वर्षाची सुरुवात केली तर काहींनी सलग आलेल्या सुट्टीचा फायदा घेत खास हॉलिडे प्लॅन्स बनवले. मराठी सिनेसृष्टी आणि बॉलिवूड स्टार्सही नववर्षाच्या स्वागताला भारताबाहेर पडले आहेत. सैफिन तैमूर सोबत स्वित्झर्लंडला गेली आहे तर मराठमोळी अमृता खानविलकर नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी यंदा पहिल्यांदा सोलो ट्रिपवर आहे. मग पहा कलाकार मंडळींचं नवंवर्ष सेलिब्रेशन कसं सुरु आहे?
विराट आणि अनुष्का
विराट आणि अनुष्का शर्मा यांनी यंदा ऑस्ट्रेलियामध्ये नववर्षाचं स्वागत केलं आहे. सध्या विराट भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असल्याने या जोडीने तेथेच नववर्षाचं स्वागत केलं.
सैफिना आणि तैमूर
View this post on Instagram
Ringing in the new year #saifalikhan #kareenakapoorkhan and our favourite baby #taimuralikhan
सैफ अली खान, करीना कपूर सध्या तैमूर अली खान सोबत युरोप ट्रिपवर आहेत. स्वित्झर्लंडमध्ये त्यांनी नववर्षाचं स्वागत केलं आहे. सैफिनाचा पार्टी लूक, तैमूरची बर्फ़ामधली धमालमस्ती यांचे फोटो गेले काही दिवस सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत.
आलिया आणि रणबीर कपूर
आलिया आणि रणबीर कपूर अमेरिकेमध्ये ऋषी कपूर यांच्यासोबत नववर्ष सेलिब्रेट करत आहेत. सध्या उपचारांसाठी ऋषी कपूर अमेरिकेमध्ये आहेत.
प्रियंका आणि निक
प्रियंका आणि निक ही जोडी नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. भारतामध्ये लग्न आणि रिसेप्शन सोहळा पार पडल्यानंतर दोघेही अमेरिकेला परतले. सध्या ही जोडी स्वित्झर्लंडमध्ये सेलिब्रेशन करत आहे.
अमृता खानविलकर
अमृता खानविलकर सध्या सोलो ट्रीपवर आहे. नेमकी अमृता कुठे गेली आहे याचा उलगडा झाला नसला तरीही विमानतळावर अमृताची रणवीर आणि दीपिका सोबत भेट झाली होती. अमृता पहिल्यांदाच सोलो ट्रीप वर गेली आहे.
शुभांगी गोखले
View this post on Instagram
My mum won me a soft toy and bought me hot chocolate with marshmallows! 🍦🥰 #majhelaad
शुभांगी गोखले आणि सखी गोखले लंडनमध्ये नववर्षाचं स्वागत करत आहेत. सध्या शिक्षणासाठी सखी लंडनमध्ये आहे. नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये सखीला शुभांगी गोखले यांनी जॉईन केलं आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 2019 11:54 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

