Satish Kaushik Death: सतीश कौशिक मृत्यूप्रकरणाला नवे वळण; फार्म हाऊसवर सापडली आक्षेपार्ह औषधे

अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या राजधानी दिल्लीत झालेल्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा झाला असून त्यामुळे त्यांच्या मृत्यूच्या संशयास्पद परिस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Satish Kaushik Death: सतीश कौशिक मृत्यूप्रकरणाला नवे वळण; फार्म हाऊसवर सापडली आक्षेपार्ह औषधे
Satish Kaushik (PC - Instagram)

Satish Kaushik Death: बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या राजधानी दिल्लीत झालेल्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा झाला असून त्यामुळे त्यांच्या मृत्यूच्या संशयास्पद परिस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सतीश कौशिक यांला होळी पार्टीच्या बहाण्याने एका मोठ्या बिल्डर आणि गुटखा कंपनीच्या मालकाने दिल्लीला बोलावले होते. राजोकरीतील वेस्ट एंड कॉलनी येथील एका आलिशान फार्म हाऊसमध्ये गुप्त पद्धतीने पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. तेथून काही आक्षेपार्ह औषधेही जप्त करण्यात आली आहेत. ही पार्टी कशासाठी आयोजीत केली होती? तसेच या पार्टीत कोण-कोण सहभागी झाले होते? याचा शोध पोलिस घेत आहेत.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी ते पूर्ण पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत आणि पोलिसांच्या एका पथकाने पार्टी आयोजित केलेल्या फार्म हाऊसलाही भेट दिली आहे. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, पोलिसांनी फार्म हाऊसमधून काही औषधे जप्त केली आहेत. (हेही वाचा - Satish Kaushik Death Cause: अभिनेता सतिश कौशिक यांचा मृत्यू Cardiac Arrest ने झाल्याचा प्राथमिक अंदाज - सूत्र)

पोलिसांनी सांगितले की, एका उद्योगपतीच्या फार्म हाऊसवर आयोजित केलेल्या पार्टीला उपस्थित असलेल्या पाहुण्यांच्या यादीची छाननी केली जात आहे. या पार्टीच्या आयोजनात एका उद्योगपतीचाही हात आहे जो एका प्रकरणात फरार आहे.

सतीश कौशिक यांना होळीच्या रात्री उशिरा अचानक छातीत दुखू लागलं. त्यांना फार्म हाऊसवरून गुरुग्रामला नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पार्टीचे आयोजन करणाऱ्या बिल्डरचा शोध घेत आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Mar 11, 2023 10:23 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).