Saif Ali Khan Attack Case: अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणातील संशयिताचा नवीन फोटो आला समोर; ओळख लपवण्यासाठी बदलले कपडे
संशयित हल्लेखोराचा सीसीटीव्ही फुटेजमधील एक नवीन फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये हल्लेखोर वेगवेगळ्या कपड्यांमध्ये दिसत आहे. हे फुटेज घटनेपूर्वीचे आहे की, नंतरचे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Saif Ali Khan Attack Case: बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) वर त्याच्या मुंबईतील (Mumbai) वांद्रे येथील निवासस्थानी (Bandra Residence) एका अज्ञात घुसखोराने गुरुवारी पहाटे हल्ला केला. अज्ञात हल्लेखोराने सैफवर सहा वेळा चाकूने हल्ला केला. संशयित हल्लेखोराचा सीसीटीव्ही फुटेजमधील एक नवीन फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये हल्लेखोर वेगवेगळ्या कपड्यांमध्ये दिसत आहे. हे फुटेज घटनेपूर्वीचे आहे की, नंतरचे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अभिनेता सैफ अली खानच्या इमारतीतील पूर्वीच्या फुटेजमध्ये हल्ल्याच्या दिवशी, घुसखोर काळ्या रंगाचा टी-शर्टमध्ये दिसला होता. घटनेच्या दुसऱ्या दिवशी, सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो निळा शर्टमध्ये दिसून आला. तसेच आता समोर आलेल्या फोटोमध्ये, हल्लेखोर पिवळा टी-शर्ट घातलेला दिसत आहे. पोलिसांच्या मते, फरार संशयिताने मुंबईभोवती फिरण्यासाठी किंवा दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वांद्रेहून ट्रेनने प्रवास केला असावा. (हेही वाचा -Saif Ali Khan Insurance Details Leaked: सैफ अली खान आरोग्य विमा दावा आणि डिस्चार्ज तारीख लीक; जाणून घ्या तपशील)
अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणातील संशयिताचा नवीन फोटो आला समोर -
सैफ अली खानवरील हल्ला -
हल्लेखोराने सहा वेळा चाकूने वार केल्यानंतर, सैफ अली खानला त्याचा मोठा मुलगा इब्राहिम अली खान आणि तैमूर अली खान यांनी तातडीने लीलावती रुग्णालयात नेले. त्यानंतर रुग्णालयात त्याच्या मणक्यातून चाकूचा तुकडा काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. सैफची शस्त्रक्रिया करणारे डॉ. नितीन डांगे यांनी सांगितले की, तो रुग्णालयात गेला तेव्हा तो रक्ताने माखलेला होता. (हेही वाचा, Saif Ali Khan Health Update: सैफ अली खानच्या चाहत्यांना मोठा दिलासा, प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर अभिनेत्याला आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये आले हलवण्यात)
टाईम्स नाऊशी बोलताना डॉक्टरांनी सांगितले की, सैफची प्रकृती चांगली आहे. तो चालू शकतो, आम्ही त्याला आयसीयूमधून खोलीत हलवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, पाठीच्या दुखापतीमुळे आणि मणक्यावरील शस्त्रक्रिया आणि सीएसएफ किंवा पाठीच्या द्रवपदार्थाच्या गळतीसाठी ड्युरल दुरुस्तीमुळे आम्ही त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)