अभिनेता नील नितीन मुकेश याची मुलगी नुरवी ने हनी सिंह च्या 'Loca Loca' गाण्यावर धरला ठेका, पाहा सुपर क्युट व्हिडिओ
यात त्याचे हावभाव आणि डान्स स्टेप्स कुणालाही वेडं लावतील असे आहे.
लॉकडाऊनच्या काळात स्वत: ला सक्रिय ठेवण्यासाठी सर्व बॉलिवूडकर सोशल मिडियावर काही ना काही पोस्ट करत स्वत:ला अॅक्टिव ठेवत आहेत. त्याचबरोबर काही बॉलिवूड स्टार्स आपल्या कुटूंबासह आपल्या मुलांसह छान क्वारंटाईन वेळ घालवत आहेत. यासंदर्भातले व्हिडिओ देखील ते सोशल मिडियावर पोस्ट करत आहे. सध्या स्टारकिड्सचा जमाना आहे. त्यामुळे तैमुर पासून अनेक स्टारकिड्स देखील चर्चेत आहे. त्यातीलच एक क्युट स्टारकिड्स म्हणजे अभिनेता नील नितीन मुकेश (Neil Nitin Mukesh) ची मुलगी नुरवी (Nurvi). नील ने नुकताच तिचा एक क्युट डान्स व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओत ती यो यो हनी सिंह च्या 'लोका लोका' थिरकताना दिसत आहे. यात त्याचे हावभाव आणि डान्स स्टेप्स कुणालाही वेडं लावतील असे आहे. Lockdown च्या काळात सैफ अली खान आपला मुलगा तैमुरचे केस कापण्यासाठी बनला हेअर स्टायलिस्ट, पाहा क्युट फोटो
या व्हिडिओखाली नील ने हे नुरवीचे आवडते गाणे आहे असे म्हटले आहे. 20 सप्टेंबर 2018 मध्ये नुरवीचा जन्म झाला. नुरवीचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल देखील होत असतात. तिचे निखळ हास्य आणि निरागस हावभाव यामुळे तिचे असंख्या चाहते बनले आहेत.